pune corporation | Sarkarnama

मुक्‍ता टिळक यांच्या महापौरपदावर बुधवारी शिक्‍कामोर्तब 

उमेश घोंगडे : सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 14 मार्च 2017

पुणे महापालिकेच्या महापौरपदासाठी ता.15 मार्च रोजी निवडणूक होत आहे. 162 सदस्यांच्या महापालिकेत भारतीय जनता पक्ष व आरपीआय युतीचे तब्बल 98 नगरसेवक निवडून आल्याने भाजपच्या नगरसेविका मुक्ता टिळक यांची निवड निश्‍चित आहे. उपमहापौरपदी आरपीआयचे नवनाथ कांबळे यांची निवड निश्‍चित मानली जात आहे. 

पुणे : पुणे महापालिकेच्या महापौरपदासाठी ता.15 मार्च रोजी निवडणूक होत आहे. 162 सदस्यांच्या महापालिकेत भारतीय जनता पक्ष व आरपीआय युतीचे तब्बल 98 नगरसेवक निवडून आल्याने भाजपच्या नगरसेविका मुक्ता टिळक यांची निवड निश्‍चित आहे. उपमहापौरपदी आरपीआयचे नवनाथ कांबळे यांची निवड निश्‍चित मानली जात आहे. 

या निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच शिवसेनेने उमेदवार उभे केले आहेत. मात्र भाजपला निर्विवाद बहुमत असल्याने निवडणुकीची केवळ औपचारिकता पार
पडणार आहे. पुणे महापालिकेच्या इतिहासात भाजपचा प्रथमच महापौर होणार असल्याचे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. शहरातील
बाजीराव रस्त्यावर शनिपार चौकात परिवर्तनाची गुढी उभारून आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. महापालिका निवडणुकीत आरपीआयचे सर्व उमेदवार
भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढले आहेत. त्यामुळे महापालिकेत त्यांचा स्वतंत्र गट स्थापन करण्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. महापालिकेत
आरपीआयला स्वतंत्र गटाचे अस्तित्व हवे आहे. मात्र भाजपच्या कमल चिन्हावर निवडून आल्याने हे सर्व नगरसेवक तांत्रिकदृष्ट्या भाजपचेच नगरसेवक राहणार
आहेत. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 38 नगरसेवक निवडून आल्याने तो दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. त्यामुळे महापालिकेत राष्ट्रवादी विरोधी पक्षाची भूमिका बजावणार आहे. मनसे व
कॉंग्रेसची या निवडणुकीत दारुण स्थिती झाली आहे. कॉंग्रेसचे केवळ नऊ तर मनसेचे दोन नगरसेवक निवडून आले आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख