pune-congress-worker-organises-weeklong-rajiv-gandhi-birthday-celebration | Sarkarnama

पुण्यात साजरा होणार राजीव गांधी जयंती सप्ताह 

उमेश घोंगडे
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

कॉंग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी दरवर्षी दोन ते नऊ डिसेंबर या काळात त्याग, सेवा, कर्तव्य सप्ताह साजरा करतात. या तारखांच्या दरम्यान तीन डिसेंबरला मोहन जोशी यांचा तर नऊ डिसेंबरला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचा वाढदिवस असतो. जोशी यांच्या पावलावर पाऊल ठेवत पक्षाचे पुण्यातील आणखी एक नेते गोपाळ तिवारी यांनी 12 ते 20 ऑगस्ट दरम्यान राजीव गांधी जयंती सप्ताह साजरा करण्याचे नियोजन केले आहे. 

पुणे : कॉंग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी दरवर्षी दोन ते नऊ डिसेंबर या काळात त्याग, सेवा, कर्तव्य सप्ताह साजरा करतात. या तारखांच्या दरम्यान तीन डिसेंबरला मोहन जोशी यांचा तर नऊ डिसेंबरला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचा वाढदिवस असतो. जोशी यांच्या पावलावर पाऊल ठेवत पक्षाचे पुण्यातील आणखी एक नेते गोपाळ तिवारी यांनी 12 ते 20 ऑगस्ट दरम्यान राजीव गांधी जयंती सप्ताह साजरा करण्याचे नियोजन केले आहे. 

उद्या (ता.12) या सप्ताहाचे उदघाटन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते होणार आहे. रक्तदान, व्याख्यान, कार्यकर्त्यांचे प्रबोधन अशा प्रकारचे कार्यक्रम या सप्ताहात होणार आहेत. उद्या गोपाळ तिवारी यांचा वाढदिवस आहे तर 20 ऑगस्ट ही राजीव गांधी यांची जयंती आहे. 

येत्या 20 तारखेला राजीव गांधी यांचे 75 वे जयंती वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्त गोपाळ तिवारी यांनी यावर्षी जयंती सप्ताहाला सुरवात केली आहे. 

2004 साली केंद्रातील पंतप्रधानपद नाकारल्याच्या पार्श्‍वभूमीवर मोहन जोशी यांनी सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याग, सेवा, कर्तव्य सप्ताह सुरू केला. तेव्हापासून आजपर्यंत माजी आमदार जोशी यांच्याकडून हा सप्ताह दरवर्षी अखंडितपणे सुरू आहे. दरवर्षी याच सप्ताहाच्या काळात तीन डिसेंबरला मोहन जोशी यांचा वाढदिवस साजरा करण्यात येतो. 

यावर्षी या प्रकारचा नवा उपक्रम गोपाळ तिवारी यांनी सुरू केला आहे. 12 ऑगस्ट हा गोपाळ तिवारी यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे राजीव गांधी जयंती सप्ताहाच्या काळात गोपाळ तिवारी यांचा वाढदिवस साजरा होणार आहे. 

दोन्ही कार्यक्रम वरवर पाहता व्यक्तीकेंद्रित वाटत असले तरी आपल्या नेत्याचा वाढदिवस किंवा जयंती साजरी करीत असताना स्वत:चा वाढदिवस साजरा करणे गैर नाही. त्यातून काही प्रमाणात का होईना कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होण्यास मदत होते. सध्या कॉंग्रेस पक्षाला तर अशा कार्यक्रमांची नितांत गरज आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख