पुणे काँग्रेसमध्ये वाद उफाळला, तो आता राहूल गांधींनाच मिटवावा लागणार?

अशा लोकांना निष्ठावंत कसे म्हणणार?
पुणे काँग्रेसमध्ये वाद उफाळला, तो आता राहूल गांधींनाच मिटवावा लागणार?

पुणे : शहर कॉंग्रेसकडून निष्ठावंताना सामावून घेतले जात नाही. सातत्याने अपमानित केले जात असल्याचा आरोप करीत कॉंग्रेस निष्ठावंतांचा स्वतंत्र मेळावा घेण्याचा निर्धार आज पुण्यातील निष्ठावंतांच्या बैठकीत करण्यात आला. पुढच्या महिन्यात हा मेळावा घेण्यात येणार असून या मेळाव्याला राहूल गांधी यांना निमंत्रित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

निष्ठावंतांच्या या बैठकीला आमदार अनंत गाडगीळ, संजय बालगुडे, मुक्तार शेख, अनिल सोंडकर, सुनील मलके, काका धर्मावत, डॉ. सतीश देसाई, नरेंद्र व्यवहारे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार असूनही शहर कॉंग्रेसच्यावतीने होणाऱ्या कार्यक्रमाला बोलावण्यात येत नाही. बोलावलेच तर एका बाजूला बसवून अपमान करण्यात येतो, असे यावेळी आमदार गाडगीळ यांनी सांगितले. देशात कॉंग्रेसला चांगले दिवस येत असताना पुण्यात अशी स्थिती का ? असा प्रश्‍न कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. मुळात शहर कॉंग्रेसकडून सामान्य कार्यकर्त्यांनाही पक्षाच्या कार्यक्रमात सामावून घेण्यात येत नाही, असा आरोप आमदार गाडगीळ यांनी सांगितले. 

या संदर्भात कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी निष्ठावंतांवर टीका केली. शहर कॉंग्रेसच्या कार्यक्रमांना बोलावूनदेखील ठराविक लोक जाणीवपूर्वक दूर राहतात. वरिष्ठ नेते आले की त्यांच्या पुढे-पुढे करतात. कार्यक्रमाला न येता टीका करतात. ज्यांनी महापालिका निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केले. काहींनी तर थेट इतर पक्षात जाऊन पक्षाच्याविरोधात निवडणून लढविली, अशा लोकांना निष्ठावंत कसे म्हणणार, असा प्रश्‍न त्यांनी केला. 

दरम्यान शहर कॉंग्रेसची आज बैठक झाली. या बैठकीत "शक्‍ती ऍप' आणि बूथ कमिटी स्थापन करण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पक्षाची सदस्य नोंदणी व निधी गोळा करण्याच्या कामाला प्राधान्य देण्यात यावे, असे आवाहन शहराध्यक्ष बागवे यांनी केले. शहर कॉंग्रेसच्यावतीने जनसंपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे बागवे यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com