pune-burglar-tries-to-rob-dilip-kamble-office | Sarkarnama

सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांचे पुण्यातील कार्यालय फोडण्याचा चोरट्याचा प्रयत्न

उमेश घोंगडे
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

पुणे : सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या पुण्यातील वानवडी परिसरातील कार्यालय गुरूवारी रात्री चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. आज दुपारी ही घटना उघडकीस आल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

या निमित्ताने पुण्यातील वाढत्या घरफोड्यांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. गेल्या काही महिन्यात पुण्यात घरफोड्यांचे सत्र वाढत आहे. अनेक घटनांमध्ये पोलीस आरोपींपर्यंत पोचू शकत नाही. मंत्र्यांचेच कार्यालय फोडल्याने आता सामान्य माणसाच्या घरफोड्यांचा तपास पोलीस वेगाने करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 

वानवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा वानवडी परिसरात कार्यालय आहे. गुरूवारी सायंकाळी कार्यालय बंद होते. चोरटयांनी कटरच्या सहाय्याने कार्यालयाचा कडी-कोयंडा तोडून प्रवेश केला. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. या कार्यालयाशेजारी असलेल्या दोन फ्लॅट फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. शुक्रवारी दुपारी ही घटना एका महिलेला समजली. तिने वॉचमनला हा प्रकार सांगितला. 

राज्यमंत्र्यांचेच कार्यालय फोडल्याने पोलीस यंत्रणा जागी झाली. शहरात गेल्या काही महिन्यांत घरफोड्यात वाढ झाली आहे. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम नव्याने रूजू झाल्यानंतर मंत्र्यांचे कार्यालय फोडल्याने पोलीस यंत्रणेला मोठे आव्हान मानले जात आहे. मंत्र्यांच्या कार्यालयाच्या घरफोडीची चौकशी पोलीस तातडीने करतीलच. मात्र सामान्य माणसाचे काय असा प्रश्‍न या निमित्ताने निर्माण झाला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख