एका लातूरकराला व्हायचेय पुण्याचा खासदार...

एका लातूरकराला व्हायचेय पुण्याचा खासदार...

लातूर : माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील- चाकूरकर, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख अशा दिग्गजांच्या विरोधात लातूरमधून निवडणूक लढवलेले लातूरचेच विजयप्रकाश कोंडेकर यांना आता पुण्याचा खासदार व्हायचे आहे. त्यासाठी ते पुण्यातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. नुसतेच खासदार नव्हे तर अपक्षांच्या गटातून पंतप्रधान व्हायची इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे. 

कोंडेकर हे सरकारी अधिकारी होते. त्यांनी 1990 मध्ये स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. त्यानंतर ते राजकारणात उतरले. अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी शिवराज पाटील- चाकूरकर, विलासराव देशमुख यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या. नगरपालिकेपासून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपर्यंत ते उमेदवार म्हणून सहभागी झाले होते. या निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला असला तरी यंदाच्या निवडणुकीत ते पुन्हा एकदा आणि तेही पुण्यातून आपले नशीब आजमावत आहेत. 

कोंडेकर म्हणाले, " भारताला स्वातंत्र्य मिळाले असले तरी ते स्वातंत्र्य सामान्य नागरिकांना अद्याप मिळालेले नाही. केवळ राजकीय पक्षांना मिळाले आहे. आणि हे पक्ष पैशांच्या, उद्योगपतीच्या मागे धावत आहेत. सामान्य माणसाचे प्रश्न, त्यांचे जगणे याला महत्व राहिले नाही. त्यामुळे त्यांच्या समस्या तशाच राहिल्या आहेत. ही भूमिका घेत मी निवडणुकीत उतरलो आहे. माझ्यासारखे अपक्ष प्रत्येक ठिकाणी आहेत. आम्ही सगळे निवडून आलो तर दिल्लीत आम्हाला आमचे सरकार स्थापन करता येईल.' 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com