गुन्हेगाराने पुन्हा गुन्हा केला तर ते आमच्यासाठी चॅलेंज : सहआयुक्त रवींद्र शिसवेंचा इशारा

गुन्हेगारांच्या कुंडल्या तयार आहेत...
IPS Ravindra Shisave
IPS Ravindra Shisave

पुणे : गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी पुणे पोलिसांकडून शहरातील प्रत्येक गुन्हेगाराची कुंडलीच तयार केली जात आहे. गुन्हेगाराचे नाव घेताच, त्याचे संपूर्ण रेकॉर्ड समोर येते. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात आली असून आता यापुढे पुणेकरांना कायदा-सुव्यवस्थेची खात्री निश्चितपणे मिळू शकेल, असा विश्वास पोलिस सहआयुक्त रविंद्र शिसवे यांनी व्यक्त केला.

शहरात लॉकडाऊननंतर गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. लॉकडाऊन काळात अत्यंत कमी गुन्हे घडले होते. पण अचानक गुन्ह्यांमध्ये वाढ होऊ लागल्यानंतर पुणे पोलिसांकडून विविध उपाययोजना राबविण्यात आला. यासंदर्भात शिसवे  यांनी `सरकारनामा`शी बोलताना माहिती दिली.

ते म्हणाले, शहरातील गुन्हांचे प्रमाण कमी करण्याकडे आमचे संपूर्ण लक्ष आहे. लॉकडाऊननंतर घडलेले काही गुन्हे पोलिस आयुक्तांसह आम्ही पोलिस स्टेशनला बसून डिेटेक्ट केले. त्यानंतर पुन्हा असे गुन्हे घडले नाहीत. पण त्याच्या मुळाशी जाणे गरजेचे होते. म्हणून प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये सर्व्हिलन्स अॉफिसर हे पद निर्माण केले. संबंधित पोलिस ठाण्याच्या ह्ददीतील सर्व गुन्हेगारांच्या कुंडल्या तयार करून त्यावर कारवाई करणे, हे एकच काम त्या अधिकाऱ्यावर सोपविले. या कामामुळे कोणत्याही गुन्हेगाराचे नाव घेतले तरी त्याचे संपुर्ण रेकॉर्ड पुढे येते. पण ही केवळ माहिती म्हणून नाही तर त्यावर लगेच कारवाईही होते. एखाद्या गुन्हेगाराने पुन्हा गुन्हा करणे, हे आता आम्ही आमच्यासाठी चॅलेंज मानणार आहोत. आताही अनेक गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविले आहे. हे नियंत्रण पुढेही राहील. प्रत्येकाच्या कामात एकवाक्यता ठेवून ते सतत अद्ययावत केले जात आहे. त्यानंतर आम्ही दोन-तीनवेळा All out Operation राबविले. त्यामध्ये बाहेर आलेले गुन्हेगार, काही `रायझिंग गॅंग`वर नियंत्रण मिळविले. त्यादृष्टीने यंत्रणा सज्ज करत आहोत. त्याची जबाबदारी संबंधित पोलिस ठाण्यावर असेल. या यंत्रणेची फळे आपल्याला पुढील काही महिन्यांत दिसतील. पुढे जाऊन कोणतीही घाईगडबड न करता केसेस अधिक प्रभावी बनविणे, त्या कायद्याच्या कसोटीवर टिकतील, याची काळजी घेतली जात आहे. गुन्ह्यांवर नियंत्रण व कायदा-सुव्यवस्थेची खात्री आम्ही पुणेकरांना देऊ शकतो.

पोलिस पळून जाणे लाजिरवाणे होते...

काही दिवसांपूर्वी चोरट्यांना पाहून पळून गेलेल्या पोलिस कमर्चायांमुळे पुणे पोलिसांना मान खाली घालावी लागली होती. या घटनेविषयी बोलताना ते म्हणाले, ही लाजीरवाणी घटना आहे. त्याचे कोणत्याही अर्थाने समर्थन करता येणार नाही. लोकांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आमचे काम आहे. त्यामुळे या प्रकरणातील कमर्चायांना निलंबित करण्यात आले. त्यातून आम्ही काही गोष्टी शिकलो. रात्रीच्या वेळी नियंत्रणामध्ये काही त्रुटी जाणविल्या. त्यानुसार नाईट राऊंड आफिसर सक्षम करणे, त्याच्यावर जबाबदारी निश्चिती, बीट मार्शलच्या रचनेत बदल करणे आदी मुद्यांवर काम करत आहोत. कच्चे दुवे हेरून ते अधिक सक्षम करत आहोत.

वाढलेल्या सायबर गुन्ह्यांविषयीही शिसवे यांनी भाष्य केले. लॉकडाऊन काळात लोकांना फिरण्यावर अनेक निर्बंध होते. या काळात लोकांच्या मनात भितीही होती. मोबाईलचा वापर, स्क्रीन टाईमही प्रचंड वाढल्याचे विविध अभ्यांसातून पुढे आले आहे. त्यानंतर बाहेर पडल्यानंतर त्याचे काम मानसिक परिणामही झाले. आज प्रत्येक घटकाकडे मोबाईल आहे. पण तो
वापरायचा कसा हेही शिकायला हवे. त्याबाबतची जनजागृती अद्याप नाही. लॉकडाऊनपूर्वी शाळा, महाविद्यालयांतील प्रत्येक मुलाला सायबर क्राईम साक्षर बनवायचे, हे आमचे उद्दिष्ट होते. तो आमचा `अॅम्बेसिडर` असेल. तो ज्या परिसरात राहतो, फिरतो तिथे जनजागृती करेल. त्यांना प्रमाणपत्र देण्याची योजना होती. पण शाळा व महाविद्यालये सुरू न झाल्याने ते बारगळले. सध्या याबाबतच्या तक्रारी आल्यानंतर आम्ही तातडीने कार्यवाही करत आहोत. तसेच जनजागृतीसाठी आम्ही काही सेलिब्रिटी घेऊन व्हिडिओ क्लिप तयार करत आहोत. यामध्ये खासगी संस्था, स्वयंसेवी संस्थांची मदतही घेणार आहोत. त्याचा नागरिकांना निश्चितिच फायदा होईल. लोकांकडून सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा शिसवे यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com