मानसी नाईकांना धमकविणाऱ्याला फौजदार शुभांगी कुटेंनी रात्रीच पकडले..

...
मानसी नाईकांना धमकविणाऱ्याला  फौजदार शुभांगी कुटेंनी रात्रीच पकडले..

शिक्रापूर :  अभिनेत्री मानसी नाईक यांच्या विनयभंग प्रकरणाचा गुन्हा रांजणगाव पोलिस स्टेशनला वर्ग होताच पोलिस अधिक्षक डॉ.संदीप पाटील यांनी हे प्रकरण तपासासाठी शुभांगी कुटे या महिला पोलिस अधिका-यांकडे सोपविले. दरम्यान कुटे यांच्या पथकाने मध्यरात्री तीन वाजता पुण्यात छापा टाकून या प्रकरणातील मुख्य आरोपी अजय अशोक कल्याणकर याला पुण्यातून अटक केली.

तीन दिवसांपूर्वी युवासेनेचे मुख्य पदाधिकारी बापूसाहेब शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने झालेल्या एका कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री-नर्तिका मानसी नाईक यांना धक्काबुक्की करुन त्यांच्या विनयभंग झाल्याची तक्रार त्यांनी मुंबईत साकीनाका पोलिस स्टेशनला दाखल केली. 

हा गुन्हा काल रात्री साडेआठच्या सुमारास रांजणगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. याबाबत जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.संदीप पाटील यांनी स्वत: लक्ष घालून रांजणगावचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल कदम, पोलिस नाईक अजित भुजबळ, मंगेश थिगळे, किशोर तेलंग, प्रफुल्ल भगत, मिलींद देवरे, अमोल नलगे यांचेसह फौजदार शुभांगी कुटे यांचे पथक तयार केले.

या पथकाने रात्रीच पुण्यातील स्वारगेट भागातील पर्वतीदर्शन येथे राहणारा अजय अशोक कल्याणकर (वय २३) याला अटक केली. दरम्यान उर्वरित दोन आरोपी डॉ.संतोष पोटे व डॉ.सुनिता पोटे (दोघेही रा.शिरुर) यांनी अटकपूर्व जामिन घेतल्याची माहिती कुटे यांनी दिली. याबाबत या प्रकरणाचा तपास आपल्याकडे असून अत्यंत काटेकोरपणे तपास करुन याबाबतची प्रत्येक घडामोडे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत व अधिक्षक डॉ.संदीप पाटील यांचेना कळवित असल्याचेही कुटे यांनी सांगितले.

पोलिसांच्या बाबतीत पूर्ण समाधानी : मानसी नाईक
मुंबईतील साकीनाका पोलिस आणि रांजणगाव पोलिस यांचा या संपूर्ण प्रकरणाबाबत मला खुपच चांगला प्रतिसाद मिळत असून मी तक्रार दाखल केल्यानंतर तपासाची सूत्रे ज्या पध्दतीने फिरली ती महाराष्ट्र पोलिसांचा खूपच गर्व वाटावा अशी आहेत. या प्रकरणाला नेमलेल्या फौजदार शुभांगी कुटे या सातत्याने संपर्कात असून त्यांनीही खूपच चांगले सहकार्य केल्याची माहितीही नाईक यांनी दिली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com