pruthviraj chavan ex cm | Sarkarnama

राफेल प्रकरणात केंद्राकडून न्यायालयाला चुकीची माहिती दिली गेली - पृथ्वीराज चव्हाण

उमेश घोंगडे
शनिवार, 15 डिसेंबर 2018

पुणे : राफेल प्रकरणात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला चुकीची माहिती दिली असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पुण्यात केला. राफेल प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इतकेच गृहमंत्री राजनाथसिंह व परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज हेदेखील जबाबदार आहेत, असाही आरोप चव्हाण यांनी केला. 

राफेल प्रकरणात केंद्र सरकारने चुकीच्या पद्धतीने काम केले आहे. या प्रकरणात केंद्र सरकारने निकाल दिला आहे तो सरकारने दिलेल्या माहितीवर आधारीत आहे. मात्र सरकारने न्यायालयात चुकीची माहिती दिली आहे, असे त्यांनी सांगितले. न्यायालयाने निकाल दिला असला तरी येत्या लोकसभा निवडणुकीच्या केंद्रस्थानी राफेलचा मुद्दा राहील. न्यायालयाने क्‍लिप चिट दिली याचा अर्थ केंद्र सरकार दोषी नाही, असा होत नाही. मुळात न्यायालयाला सरकारने चुकीची माहिती दिल्याने न्यायालयाने त्याआधारे निकाल दिला आहे. यातील सत्य जनतेसमोर येईपर्यंत कॉंग्रेस पक्ष राफेल लढा लढणार आहे. आम्ही जनतेला वस्तुस्थिती सांगू. त्याचे उत्तर भारतीय जनता पार्टीला व सत्तेत असलेल्या पंतप्रधान मोदी यांना द्यावे लागेल, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्याने भाजपा व केंद्र सरकारने आपण यातून सुटलो या भ्रमात राहू, नये. त्यांना आम्ही लोकांच्या न्यायालयात खेचणार आहोत. त्याचे उत्तर भाजपाला द्यावेच लागणार आहे. देशाच्या संरक्षणासाठी घेतलेल्या साधनसामग्रीची माहिती आणि त्याची किंमत समजून घेणे हा जनतेचा हक्क आहे. ती माहिती सरकारने देणे बंधनकारक असताना जाणीवपूर्वक लपवण्यात येत आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत हाच मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी राहणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख