गोपीनाथ मुंडेंना पक्षातून काढण्याचा ठराव भाजपमध्ये मांडला गेला होता!  - proposal of expelling gopinath munde from BJP was discussed in the past, says prakash shendge | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

गोपीनाथ मुंडेंना पक्षातून काढण्याचा ठराव भाजपमध्ये मांडला गेला होता! 

संपत मोरे
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

पंकजा यांचा भाजपच्या नेत्यांनी पराभव केला आहे,असा आरोप शेंडगे यांनी केलाय.

पुणे : 'गोपीनाथ मुंडे यांच्यावर भाजपने अन्याय केला. आता तेच पंकजा मुंडे यांच्याबाबतही होत आहे. पंकजा यांना भाजप नेत्यांनीच मतदारसंघात पराभूत केले. आण्णा डांगे, गोपीनाथ मुंडे, दौलतराव आहेर यांसारखे नेते भाजपने संपवले" असा आरोप माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केला आहे.

प्रकाश शेंडगे यांची भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे समर्थक अशी ओळख होती. २०१४ साली त्यांनी भाजपची साथ सोडली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रचार केला आहे.

पंकजा मुंडे यांच्या नाराजीनंतर शेंडगे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

"भाजपने गोपीनाथ मुंडे यांना पक्षातून काढून टाकण्याचा ठराव मांडला होता. त्याला आम्ही विरोध केला होता. भाजपने मुंडे यांचे नेहमीच खच्चीकरण केले. तोच प्रकार पंकजा यांच्याबाबत सुरू आहे. पंकजा यांनी वेळीच सावध व्हावे."असे शेंडगे यांनी म्हटले आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख