काँग्रेसमध्ये मतभेद उसळले :  राजस्थानात गेहलोत यांच्याविरुद्ध पायलट गट सक्रिय 

लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर कोमात गेलेल्या कॉंग्रेसमधील अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत चालली असून राहुल गांधी हे कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडण्यावर ठाम आहेत. या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर आज राजस्थान, आंध्रप्रदेशातील पक्षांतर्गत वाद उफाळून आल्याने कॉंग्रेस पक्ष मोठ्या राजकीय कोंडीत सापडला आहे.
काँग्रेसमध्ये मतभेद उसळले :  राजस्थानात गेहलोत यांच्याविरुद्ध पायलट गट सक्रिय 

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर कोमात गेलेल्या कॉंग्रेसमधील अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत चालली असून राहुल गांधी हे कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडण्यावर ठाम आहेत. या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर आज राजस्थान, आंध्रप्रदेशातील पक्षांतर्गत वाद उफाळून आल्याने कॉंग्रेस पक्ष मोठ्या राजकीय कोंडीत सापडला आहे.

कॉंग्रेसचा हक्काचा बालेकिल्ला असणाऱ्या राजस्थानमध्ये नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला भोपळाही फोडता आला नव्हता, राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना खुद्द मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे त्यांच्या मुलाच्या प्रचारामध्ये व्यग्र होते, त्यांनी जाणीवपूर्वक पक्षाच्या प्रचाराकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप अन्य नेत्यांनी केला आहे. गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट गट सक्रिय झाला असून त्यांनी राज्यातील या घडामोडी पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातल्या आहेत. गेहलोत आणि पायलट हे दोघेही काल दिल्लीमध्ये राहुल यांची भेट घेण्यासाठी आले होते. पण त्यांची राहुल यांच्याशी चर्चा होऊ शकली नाही. 

प्रियंका गांधींनी या दोन्ही नेत्यांशी चर्चा केल्याचे समजते. दक्षिणेचे महाद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्नाटकातही कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या आघाडी सरकारमध्ये कुरबुरी सुरू झाल्या आहेत. हा वाद मिटविण्यासाठी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि पक्षाचे सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल यांनी आज बंगळूरला धाव घेतली. मध्यंतरी कॉंग्रेसच्या दोन आमदारांनी माजी मुख्यमंत्री एस.एम.कृष्णा यांची भेट घेतल्याने पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com