प्रियांका गांधी, ज्योतिरादित्य शिंदे ,शत्रुघ्न सिन्हा महाराष्ट्रात प्रचार करणार 

.
rahul_priyanka_jyotiraditya
rahul_priyanka_jyotiraditya

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी आज कॉंग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या स्टार प्रचारक मध्ये अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, राहुल गांधी, मल्लीकर्जून खरगे, गुलाब नबी आझाद, ज्योतिरादित्य शिंदे, यांच्यासह प्रियांका गांधी, ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, अशोक गहलोत या नेत्यांचा समावेश आहे.

कॉंग्रेसचे हे नेते 21 ऑक्‍टोबरपर्यंत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये आणि महत्वाच्या मतदार संघांमध्ये प्रचारसभा घेणार आहेत. तर राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि शत्रुघ्न सिन्हा, सचिन पायलट आदी नेत्यांचे राज्यातील प्रमुख शहरांमध्ये रोड शो आयोजित करण्याची तयारी प्रदेश कॉंग्रेसकडून करण्यात आली आहे. राज्यात कॉंग्रेस- राष्ट्रवादीची महाआघाडी असल्याने अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांतील प्रमुख नेत्यांच्या संयुक्त सभाही आयोजित करण्यात येणार असून त्यासाठीचे नियोजन पूर्ण झाले आहे.

आज जाहीर करण्यात आलेल्या जणांच्या स्टार प्रचारांच्या यादीत कॉंग्रेसकडून राज्यातील प्रमुख नेत्यांमध्ये कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,राजीव सातव, रजनी पाटील, विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, ज्येष्ट पत्रकार मधुकर भावे, ज्येष्ठ नेते नाना पटोले,

नितीन राऊत, माणिकराव ठाकरे, एकनाथ गायकवाड, सचिन सावंत, हुसेन दलवाई, नसीम खान, बसवराज पाटील मुरूमकर, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम, अमर राजूरकर, सुस्मिता देव, कुमार केतकर चारुलता टोकस, मुकुल वासनिक, अविनाश पांडे यांचा समावेश आहे.

देशभरातील नेत्यांमध्ये दलित नेते उदित राज, आर.सी. कुंटीया, अभिनेत्री नगमा मोराजी, ज्येष्ठ नेते अशोक गहलोत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, ज्येष्ठ नेते व छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आदी नेतेही राज्यात प्रचाराला येणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com