priyanka gandhi vadra meet in bikaner | Sarkarnama

'यूपी'तील रोड शो संपतात प्रियंका अडचणीतील पतीच्या भेटीला बिकानेरमध्ये 

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

जयपूर : यूपीतील तूफान गर्दीचा "रोड शो' संपताच कॉंग्रेसच्या सरचिटणीस तातडीने सोमवारी संध्याकाळी तातडीने बिकानेरमध्ये दाखल झाले. पती रॉबर्ट वद्रा हे ईडीसमोर उपस्थित राहण्यासाठी बिकारनेला पोचले होते. वद्रा यांची भेट घेण्यासाठी त्या विशेष विमानाने येथे दाखल झाल्या होत्या.

एकीकडे लोक जल्लोषात स्वागत करीत होते त्यांचा एकीकडे आनंद त्या घेते होत्या तर दुसरीकडे अडचणीत सापडलेल्या वद्रांचीही त्यांना चिंता वाटत होती. 

मी माझ्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असे प्रियंकांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. त्या कॉंग्रेसमध्ये सक्रीय झाल्या आहेत. यूपीची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर पक्षाने टाकली आहे. या राज्यातील जनतेने त्यांचे स्वागतही केले.

यावेळी पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी आणि दुसरे सरचिटणीस ज्योतिरादित्यही उपस्थित होते. कालचा पंधरा किलोमीटरचा रोड शो संपल्यानंतर प्रियका तातडीने बिकानेरकडे वळल्या. वद्रा तेथे एका हॉटेलमध्ये थांबले होते. 

ईडीच्या चौकशीसाठी वद्रांना सामोरे जावे लागत आहे याविषयी त्या म्हणाल्या,"" रॉबर्ट हे माझे पती आहे, ते माझे कुटुंब आहे आणि माझ्या कुटुंबाला माझा भक्कम पाठिंबा आहे. वद्रा यांची ईडीने आतापर्यंत चारवेळा चौकशी केली आहे. जमीन घोटाळ्यात वद्रां यांचे नाव आहे. या घोटाळ्याची कसून चौकशी सुरू आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख