भाजप है तो सौ रूपये किलो प्याज भी मुमकीन है, प्रियंका गांधींनी मोदींवर डागली तोफ

  भाजप है तो सौ रूपये किलो प्याज भी मुमकीन है, प्रियंका गांधींनी मोदींवर डागली तोफ

नवी दिल्ली : देशात महागाईने उच्चांक गाठला आहे, तरूणांच्या हाताला काम नाही, गेल्या सहा वर्षात पंधरा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, भाजप है तो सौ रुपये किलो प्याज भी मुमकिन है असे एकामागोमाग एक प्रश्‍नांचा भडिमार करीत कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी येथील रामलिला मैदानावरून मोदी सरकारवर तोफ डागली. 

रामलिला मैदानावर कॉंग्रेसने भारत बचाव रॅली काढली असून कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी हेच या रॅलीचे आकर्षण असले तरी प्रियंका गांधी यांनीही मोदी सरकारच्या गेल्या सहा वर्षातील कारभारावर जोरदार टीकास्त्र सोडले. या रॅलीत देशभरातून हजारो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली आहे. 

प्रियंका गांधी म्हणाल्या, की हा देश शेतकऱ्यांचा, राबणाऱ्या हातांचा, देशासाठी लढणाऱ्या सैनिकांचा, कामगारांचा आहे. लोकशाहीला बळकट साथ देणारा आहे पण, गेल्या गेल्या सहा वर्षापासून देशात नको ते उद्योग सुरू आहेत. आज देश मोठ्या संकटातून जात आहे. देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. लोकांच्या हाताला काम नाही. शेतकरी आत्महत्या करतो.

मोदी सरकारची धोरणे याला कारणीभूत आहेत. मोदी राजवटीत रोजगारात प्रचंड घट झाली आहे. महागाई वाढली आहे. असे भयावह चित्र असताना माध्यमातून मात्र मोदी है तो मुमकीन है ! म्हटले जात आहे. प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे ते संविधान वाचविण्याचे. मोदी सरकारच्या काळात कांदा शंभर रूपये झाला तरीही ही मंडळी मोदींची आरती ओवाळत असल्याचीही टीका त्यांनी केली. 

प्रियंका गांधींच्या भाषणाला यावेळी रॅलीने जोरदार प्रतिसाद दिला. गांधी यांनी मोदी सरकारवर तोफ डागताच टाळ्यांचा प्रचंड कडकडात झाला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com