शिवसेनेतला माझा प्रवेश आदित्यजींमुळेच - प्रियंका चतुर्वेदी

शिवसेनेतला माझा प्रवेश आदित्यजींमुळेच - प्रियंका चतुर्वेदी

मुंबई : कॉंग्रेसच्या एकेकाळच्या प्रवक्‍त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी आपण शिवसेनेत आलो ते थेट आदित्य ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतरच. माझ्या बाबतीत कॉंग्रेस पक्षात जे घडले त्यानंतर माझ्याशी आदित्य ठाकरे यांनी संपर्क केला आणि तुम्ही मुंबईत का काम करत नाही असा प्रश्‍न केला. त्यापूर्वी काही महिने मी त्यांच्या संपर्कात होते. आमचे पक्ष वेगवेगळे असले तरी आम्ही एकमेकांच्या कामाचे कौतुक फोनवरून करत असो त्यामुळे त्यांच्या प्रस्तावावरून मी शिवसेनसाठी काम करायचा निर्णय घेतला असा थेट गौप्यस्फोट केला. एका खासगी वाहिनीवरच्या मुलाखतीत त्यांनी अनेक अडचणींच्या प्रश्‍नांना थेट उत्तरे दिली आणि कुठेही लपवालपवीची भूमिका न घेता आपला मुद्दा ठामपणे मांडला. 

तुम्हाला शिवसेनेऐवजी भाजपमध्ये जायचे होते, पण स्मृती इराणी यांनी तुमचा प्रवेश रोखला, त्याचबरोबर प्रशांत किशोर यांच्यामुळे तुम्ही शिवसेनेत आलात असे समजले जाते त्यावर प्रियंका चतुर्वेदी यांनी निःसंदिग्ध शब्दात आपली भूमिका स्पष्ट केली त्या म्हणाल्या, मला भाजपमध्ये जायचेच नव्हते त्यामुळे स्मृती इराणी यांनी माझा प्रवेश रोखला यात काहीही तथ्य नाही तसेच प्रशांत किशोर यांच्यामुळे मी शिवसेनेत आले असे नाही तर आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चेनंतर शिवसेनेत आले. माझी पक्षाकडून कुठल्याही पदाची अपेक्षा नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com