उदयनराजेंविरोधात निवडणूक लढणार नाही!

कोणीतरी माझ्या नावाची विनाकारण चर्चा करत आहे.
उदयनराजेंविरोधात निवडणूक लढणार नाही!

कऱ्हाड (सातारा): खासदार उदयनराजे यांच्या विरोधात माजी खासदार श्रीनिवास पाटील व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची नावे आज चर्चेत आली. सोशल मीडियासह लोकांतून दोन्ही नावांची जोरदार चर्चा सुरू झाली. त्या चर्चेला पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र नकार दिला आहे. 

लोकसभा लढविण्याची कोणतीही चर्चा नाही. मी लढणार नाही, असे स्पष्ट करत कऱ्हाड दक्षिणेतून आमदारकी लढणार असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. यासंदर्भात श्रीनिवास पाटील यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

श्री. चव्हाण म्हणाले, "मी लोकसभा लढवणार नाही. कोणीतरी माझ्या नावाची विनाकारण चर्चा करत आहे. मात्र, त्याचा माझ्याशी कसलाही संबंध नाही. मी विधानसभा निवडणूक कऱ्हाड दक्षिणेतून लढणार आहे. त्यामुळे कोणताही संभ्रम ठेवू नका.''
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com