विधानसभाच लढणार, लोकसभा नाही : पृथ्वीराज चव्हाण

मी गुरूवारी कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
विधानसभाच लढणार, लोकसभा नाही : पृथ्वीराज चव्हाण

कऱ्हाड : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे गुरूवारी (ता. 3) कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याला पृथ्वीराजबाबांनीही दुजोरा दिला आहे. सातारा लोकसभा निवडणुक लढविण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र, आघाडीच्या पातळीवर त्यावर अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. त्यामुळे कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार संघातून लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांनी लढावे यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून प्रयत्न सुरू होते. त्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चाही सुरू होती. या संदर्भात श्री. चव्हाण यांनी कालच (ता. 29) कऱ्हाडमध्ये कार्यकर्त्यांचा कल जाणून घेतला होता. त्यात बहुतांश सर्वच कार्यकर्त्यांनी आमदार चव्हाण यांनी कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला होता. कार्यकर्त्यांचा आग्रह व त्यांच्या भावनांचा आदर करून येत्या दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याचे श्री. चव्हाण यांना मेळाव्यात जाहीर केले होते.

दरम्यान, येथील निवडणूक कार्यालयातून आमदार चव्हाण यांनी कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार संघातून दोन उमेदवारी घेतले आहेत. गुरूवारी ते कऱ्हाड दक्षिणेतून अर्ज दाखल करणार आहेत. कॉंग्रेसच्या बुथ समितीच्या प्रत्येक सदस्याला गुरूवारी हजर राहण्याच्या सूचना केल्या आहेत. गुरूवारी सकाळी शहरातून रॅली काढून शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला जाईल. त्यानंतर जाहीर सभेचे नियोजनही करण्यात आले आहे.

या सर्व घडामोडींबाबत आमदार चव्हाण यांनीही दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, "सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत माझ्या नावाची चर्चा आहे. त्याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही माझ्याशी चर्चा केली आहे. श्रीमती सोनिया गांधी यांच्याशीही चर्चा झाली आहे. या निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीला प्रस्ताव दिला होता. त्यावर अद्यापही आघाडीच्या पातळीवर अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे मी गुरूवारी कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com