पृथ्वीराजबाबा कार्यकर्ते आणि आमदारांशी चर्चा करून साताऱ्याबाबत निर्णय घेतील : थोरात 

पृथ्वीराजबाबा कार्यकर्ते आणि आमदारांशी चर्चा करून साताऱ्याबाबत निर्णय घेतील : थोरात 

मुंबई : सातारा लोकसभेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावासाठी आग्रह असला तरी चव्हाण हे कार्यकर्ते आणि आमदारांशी बोलून निर्णय घेतील अशी माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज मुंबईत पत्रकारांना दिली. 

दुसरीकडे मात्र सातारा लोकसभा मतदार संघावर पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलायचं टाळलं आहे.सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत आघाडीकडून कोण उमेदवार असेल याची चर्चा सुरू आहे. उदयनराजे यांनी राष्ट्रवादीला रामराम करून भाजपत प्रवेश केला आहे. वास्तविक हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाटेचा आहे. मात्र हा मतदारसंघ कॉंग्रेसला सोडण्याची तयारी राष्ट्रवादीने केली आहे. 

येथून पृथ्वीराजबाबांनी निवडणूक लढवावी यासाठी कॉंग्रेसमधील काही नेत्यांना वाटते. मात्र ते फारसे उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे. आज तर थोरात यांनी तर चव्हाण हे चर्चा करून निर्णय घेतील असे स्पष्ट केले आहे. जर चव्हाण यांनी लढण्यास नकार दिला तर राजेंविरोधात कोण याकडेही विशेषत: राज्याचे लक्ष लागले आहे. 


दोन्ही पक्षांमध्ये चारपाच जागांसंदर्भात अदलाबदलीची चर्चा सुरू आहे. आमची यादी तयार झाली आहे दिल्लीवरून कधीही ती जाहीर होवू शकते असेही थोरात यांनी शेवटी सांगितले.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com