उदयनराजेंविरोधात लढण्याबाबत पृथ्वीराज चव्हाण कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार

उदयनराजेंच्या विरोधात साताऱ्यातून लोकसभेची निवडणूक लढण्याबाबत आपण आपल्या कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेऊ असे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षा सोनिया गांधी यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चव्हाण यांनी उदयनराजेंच्या विरोधात लढावे, असा प्रस्वाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त बैठकीत ठेवला आहे.
Prithviraj Chavan - Udayanraje Bhosale
Prithviraj Chavan - Udayanraje Bhosale

मुंबई : उदयनराजेंच्या विरोधात साताऱ्यातून लोकसभेची निवडणूक लढण्याबाबत आपण आपल्या कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेऊ असे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षा सोनिया गांधी यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चव्हाण यांनी उदयनराजेंच्या विरोधात लढावे, असा प्रस्वाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त बैठकीत ठेवला आहे.

या प्रस्तावाबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी याबाबत चर्चा केली. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात चर्चा झाल्यानंतर त्या पृथ्वीराज यांच्याशीही बोलल्या. आपण म्हणाल ते मान्य असतेच पण कराडमधील कार्यकर्त्यांशी या विषयी बोलणे उचित होईल, असे चव्हाण यांनी सोनिया गांधी यांना सांगितल्याचे समजते. ही विनंती सोनिया गांधी यांनी मान्य केल्यानंतर रात्री उशीरा पृथ्वीराज चव्हाण मुंबईत परतले. 

काही महिन्यांपूर्वी शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे परस्परांशी संबंध उत्तम नव्हते, असे सांगितले जाई. त्यामुळेच दोन्ही पक्ष परस्परांना किती मदत करतात याबद्दल शंका आहे. त्यामुळेच पवारांनी या मतदारसंघासाठी तीन नावे चर्चेत आहेत असे सांगितले. चव्हाण हो म्हणतील काय याबद्दल शंका असल्याने ही संदिग्धता ठेवली गेली असावी, असे सूत्रांचे म्हणणे आहे. चव्हाण यांनाही त्यामुळेच वेळ हवा आहे. श्रीनिवास पाटील यांना तब्येतीमुळे लढणे शक्य नाही. उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीत संतापाची लाट आल्याने त्यांना हरवण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांना मदत केली जाईल, असे काँग्रेसला वाटते.

दक्षिण कराडच्या कार्यकर्त्यांशी यासंबंधात आज उद्यात चर्चा करणे म्हणजे त्यांना लढण्यास सज्ज व्हा असे सांगणे असावे, असे मानले जात आहे. सध्या सातारा लोकसभा मतदारसंघात ,शंभूराज देसाई (शिवसेना) स्वत: चव्हाण (काँग्रेस), तसेच शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील असे राष्ट्रवादीचे तीन आमदार आहेत. शिवेंद्रराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com