शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या मुद्याने पृथ्वीराज चव्हाणांवर श्रेष्ठी नाराज?

शिवसेनेला पाठिंबा देण्याची भूमिका आत्मघातकी ठरेल याबाबत कॉंग्रेस नेतृत्वात ठामपणा व पूर्ण स्पष्टता असल्याचे समजते. हे सर्व मुद्दे प्रदेश कॉंग्रेसच्या नेत्यांना सांगण्यात आले असून उगाच जाहीर मतप्रदर्शन करण्याचे प्रकार थांबवण्यात यावेत अशी समजही देण्यात आली आहे.
शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या मुद्याने पृथ्वीराज चव्हाणांवर श्रेष्ठी नाराज?

नवी दिल्ली : राज्यात शिवसेनेशी युती करून सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे अनुकूल असल्याच्या चर्चेने त्यांच्याबद्दल पक्षश्रेष्ठींनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शिवसेनेला पुढे करुन सरकार स्थापनेच्या प्रयत्नाचा त्यांनी जोरदार पुरस्कार सुरु केला होता. पण त्यांची डाळ शिजलेली नाही व उलट त्यांना कानपिचक्‍याच मिळाल्याची लक्षणे आहेत. त्यांच्या या प्रयत्नांबद्दल बोलताना एका वरिष्ठ कॉंग्रेसनेत्याने अतिशय कडवट प्रतिक्रिया व्यक्त केली.

पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते. परंतु त्यांनी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांना मदत करुन कॉंग्रेसचे अतोनात नुकसान केले. कॉंग्रेसच्या महाराष्ट्रातील अधोगतीला ते जबाबदार ठरले. त्यांनी हा प्रकार करणे उचित नाही असे हा नेता म्हणाला. त्यांना कोणते पद देण्याबाबतही फारशी अनुकूलता पक्षश्रेष्ठींच्या मनात नसल्याची माहितीही या नेत्याने दिली.

शिवसेनेला पाठिंबा न देण्याबाबत कॉंग्रेस नेतृत्व ठाम असून जनतेने विरोधात बसण्यासाठी दिलेला कौल शिरोधार्य मानून कॉंग्रेस पक्ष प्रभावी विरोधी पक्ष म्हणून काम करणार असल्याचे आज कॉंग्रेस वर्तुळातून स्पष्ट करण्यात आले.

शिवसेनेने भाजपशी युती न करता स्वतंत्र निवडणूक लढवली असती तर किमान एकवेळ त्यांना पाठिंबा देण्याबाबत विचार करता आला असता. परंतु आता ते अशक्‍य असल्याचे मतही पक्षश्रेष्ठींच्या वर्तुळातून व्यक्त झाले. दरम्यान, महाराष्ट्रातील विधिमंडळ कॉंग्रेस पक्षनेतेपदाच्या निवडीसाठी लवकरच कॉंग्रेसचे केंद्रीय निरीक्षक मुंबईला जातील अशी माहिती देण्यात आली.

प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज येथे सायंकाळी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीचे स्वरुप मुख्यतः सदिच्छाभेटीचे होते. यापूर्वी या नेत्यांनी पक्षाचे संघटन सरचिटणीस व पक्षश्रेष्ठींचे निकटवर्ती के.सी.वेणुगोपाल यांच्याशी भेट घेऊन त्यांना महाराष्ट्रातील ताज्या राजकीय घडामोडींची माहिती दिली. वेणुगोपाल यांनी या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर कॉंग्रेस पक्ष लक्ष ठेवून आहे एवढेच सांगितले. परंतु तेथील सरकार स्थापनेच्या संदर्भात त्यांनी कोणतेही मतप्रदर्शन केले नाही.

कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींच्या वर्तुळातून मिळत असलेल्या माहितीनुसार कॉंग्रेसला सरकार स्थापनेत स्वारस्य नाही. सोनिया गांधी यांनी अतिशय स्पष्ट शब्दांत ही बाब प्रदेश कॉंग्रेसच्या नेत्यांना बजावलेली आहे. शिवसेना आणि कॉंग्रेस यांच्या विचारसरणीत मूलभूत मतभेद आहेत. त्याचप्रमाणे अनेत मुद्यांवरील शिवसेनेची भूमिका ही कॉंग्रेसच्या पूर्णतया विरुध्द असताना त्यांना सरकारस्थापनेस पाठिंबा देणे कॉंग्रेसला शक्‍य नाही असे सोनिया गांधी यांनी प्रदेशच्या नेत्यांना सांगितले आहे.

अयोध्येच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लवकरच अपेक्षित आहे. या मुद्यावरील शिवसेनेची भूमिका, या मुद्यावरुन मुंबईत पूर्वी झालेल्या भयंकर दंगली या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेला पाठिंबा देण्याची भूमिका आत्मघातकी ठरेल याबाबत कॉंग्रेस नेतृत्वात ठामपणा व पूर्ण स्पष्टता असल्याचे समजते. हे सर्व मुद्दे प्रदेश कॉंग्रेसच्या नेत्यांना सांगण्यात आले असून उगाच जाहीर मतप्रदर्शन करण्याचे प्रकार थांबवण्यात यावेत अशी समजही देण्यात आली आहे.

दुसरीकडे प्रदेश कॉंग्रेसमध्येच स्वतंत्र चूल मांडण्याच्या प्रयत्नात असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची खरी अडचण झाली. शिवसेनेला पुढे करुन सरकार स्थापनेच्या प्रयत्नाचा त्यांनी जोरदार पुरस्कार सुरु केला होता पण त्यांची डाळ शिजलेली नाही व उलट त्यांना कानपिचक्‍याच मिळाल्याची लक्षणे आहेत. त्यांच्या या प्रयत्नांबद्दल बोलताना एका वरिष्ठ कॉंग्रेसनेत्याने अतिशय कडवट प्रतिक्रिया व्यक्त केली. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते परंतु त्यांनी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांना मदत करुन कॉंग्रेसचे अतोनात नुकसान केले. कॉंग्रेसच्या महाराष्ट्रातील अधोगतीला ते जबाबदार ठरले. त्यांनी हा प्रकार करणे उचित नाही असे हा नेता म्हणाला. त्यांना कोणते पद देण्याबाबतही फारशी अनुकूलता पक्षश्रेष्ठींच्या मनात नसल्याची माहितीही या नेत्याने दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com