अशोक चव्हाणांनी फडणविसांची खिल्ली उडविली आणि पृथ्वीराज यांनी वार केले...

....
prithviraj-chavan-devendra fadnavis
prithviraj-chavan-devendra fadnavis

मुंबई : ठाकरे सरकारच्या कुरापती काढत विधीमंडळ सभागृहात बाजी मारण्याच्या तयारी असलेले माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाच आता समृध्दी महामार्गाच्या गैरव्यवहारावरून सत्ताधाऱ्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात ढकलले आहे. 'या मार्गासाठी फडणवीस यांनी जादा व्याजाने ४ हजार कोटींचे कर्ज घेतले असून, मार्गाची अधिसूचना काढण्याआधी जमिनी खरेदी करून घोटाळा केला आहे,' असा आरोप  काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

भाजप सरकारच्या काळात मुंबई-नागपूर (समृध्दी) महामार्गाची आखणी करीत त्याला मंजुरी देण्यात आली. त्यासाठी स्टेट बँक इंडियाकडून सुमारे ४ हजार कोटी रपयांचे कर्ज घेण्यात आले आहे. मात्र हे कर्ज ९.७५ टक्के इतक्या व्याजदाराने घेण्यात आल्याकडे चव्हाण यांनी प्रश्नांद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले. तसेच, खुल्या बाजारात ७.३ टक्के इतक्या कमी व्याजाने कर्ज उपलब्ध असताना चढ्या भावाने कर्ज घेण्याची गरज काय? हाही मुद्दा उपस्थितीत केला.

त्याशिवाय, समृध्दी महामार्गासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केला करीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे आणि त्याबाबतची कागदपत्रे तत्कालीन मुख्यमंत्री कार्यालयात दिली आहेत, त्यावर चौकशी करण्याची मागणी केली होती, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे. त्यावर खुलासा करताना राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची लोकायुक्तांमार्फत चौकशी झाल्याचे सांगितले. मात्र, चौकशीचा अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवणार, हा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी फडणवीस यांची खिल्ली उडविण्याची संधी सोडली नाही. फडणवीस यांनी काल विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपच्या आमदारांसह आंदोलन केले होते. फडणविसांना पायरीवर बसल्याचे पाहून मला आनंद झाला, अशा शब्दांच चव्हाण यांनी खूषी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com