उदयनराजे दोन लाख मतांनी पडणार : पृथ्वीराज चव्हाण

मोदी-शहा आले तरी उदयनराजे भोसले पोटनिवडणुकीत दोन लाख मतांनी पराभूत होणार असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
उदयनराजे दोन लाख मतांनी पडणार : पृथ्वीराज चव्हाण

सातारा : मोदी-शहा आले तरी उदयनराजे भोसले पोटनिवडणुकीत दोन लाख मतांनी पराभूत होणार असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दुय्यम फलंदाज आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी कराडला येणार होते. पण त्यांनी दुय्यम फलंदाज पाठवला, अशा शब्दात पृथ्वीराज चव्हाण यांनी अमित शाहांवर टीका केली.

कराडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. कराड दक्षिण मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाणांविरोधात भाजपने विलासराव देशमुख यांचे जावई अतुल भोसले यांना तिकीट दिलं आहे, तर साताऱ्यातील पोटनिवडणुकीत उदयनराजेंविरोधात महाआघाडीतर्फे श्रीनिवास पाटील यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. या दोन्ही लक्षवेधी लढती चुरशीच्या होणार आहेत. महाराष्ट्रात येऊन इथल्या प्रश्नावर न बोलता कलम 370 वर बोलणाऱ्या अमित शाहांनी काश्मीरबाबत अभ्यास करावा, असा सल्लाही पृथ्वीराज चव्हाण यांनी शाहांना दिला.

पंडित नेहरु होते म्हणून काश्मीर भारताचा भाग असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

मी लोकसभेचा उमेदवार असतो तरीही आणि आता श्रीनिवास पाटील आहेत तरीही ते दोन लाख मतांनी जिंकणार आहेत. उदयनराजे भोसले पोटनिवडणुकीत दोन लाख मतांनी पराभूत होणार आहेत, असा दावा चव्हाणांनी केला.  पक्षश्रेष्ठींचा निर्णय म्हणून मी लोकसभा लढलो नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com