प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्यास पृथ्वीराज चव्हाणांचा नकार  

पृथ्वीराज चव्हाण यांना प्रदेशाध्यक्षपदासाठी अजून विचारणाही झालेली नाही.
 Prithviraj Chavan refuses to accept the post of state president
Prithviraj Chavan refuses to accept the post of state president

पुणे: "महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्यास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अनुकूल नसल्याचे समजते. 'मला विचारल्याशिवाय पदांची चर्चा कशी होते?' अशी भुमिका त्यांनी घेतल्याचे वृत्त आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या आघाडीची चर्चा सुरू झाल्यावर वाटाघाटी करण्याची जबाबदारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवली होती. त्यानुसार त्यांनी वाटाघाटी केल्या. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीनंतर दिल्लीतल्या न्यायालयीन लढाईत पृथ्वीराज चव्हाण यांनी विशेष लक्ष दिले होते.

"भाजप ज्या पद्धतीने विरोधी पक्षाना संपवत आहे. ती पद्धत विकृत आहे. भाजपला थांबवणे गरजेचे आहे" असे चव्हाण सातत्याने म्हणत होते. भाजपविरोधी सुरू असलेल्या प्रत्येक घडामोडीत अग्रेसर होते. नंतर उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदी शपथविधी झाल्यावर ते काहीसे मागे पडले. काँग्रेसच्या वतीने बाळासाहेब थोरात हे राष्ट्रवादी आणि शिवसेनेशी चर्चा करत होते.

आगामी मंत्रिमंडळात जाण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण इच्छुक आहेत मात्र काँग्रेस पक्षातील काही नेत्यांनी मुख्यमंत्रीपदावर काम केलेल्या चव्हाण यांनी मंत्रीपदावर काम करायला नको अशी भूमिका घेत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासोबत त्यांनी प्रदेशाध्यक्षपद घ्यावे अशीही गळ त्यांना घालण्यात आली आहे मात्र पृथ्वीराज चव्हाण प्रदेशाध्यक्षपद स्विकारण्यास अनुकूल नाहीत, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com