पृथ्वीराज चव्हाण म्हणतात वॉर्ड पद्धती नको, अजित पवार म्हणतात पाहिजे 

अजित पवार यांनी विरोध करीत, वार्ड पद्धती योग्य असल्याने विधेयक मंजूर करण्याची मागणी केली.
ajit-pawar-prithviraj-chavan
ajit-pawar-prithviraj-chavan

नागपूर  : महाराष्ट्र महानगर पालिका सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी देण्यात आली. मात्र, विधेयकावर चर्चेदरम्यान महाविकास आघाडीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री यांनी विधेयकाच्या विरोधात मत मांडून सत्ताधाऱ्यांना आश्‍चर्याचा धक्का दिला. पण अजित पवार यांनी वॉर्ड पद्धत बरोबर असल्याने तात्काळ अंमलबाजवणी करावी असे सांगितले . 


 यावेळी  विधेयक घाईने मंजूर करण्यापेक्षा चर्चेसाठी संयुक्त समितीकडे पाठविण्याची मागणी श्री. चव्हाण यांनी केली.

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र महानगर पालिका सुधारणा विधेयक चर्चेसाठी सभागृहात मांडले. यावर चर्चा करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी मागल्या सरकारने चार प्रभाग पद्धतीचा अवलंब करण्यात आला होता. यापूर्वीही 2001 आणि त्यानंतर दोनदा यामध्ये बदल करण्यात आला होता. 


महापालिकेत निवडणुका लढताना विविध आरक्षणामुळे अनेकदा चांगले काम करणाऱ्या नगरसेवकाची पुढली संधी हुकते. त्यामुळे त्याची पाच वर्षाची मेहनत वाया जाते. शिवाय त्याच्या वार्डातील जनतेवर अन्याय होतो. त्यामुळे ही भावना आणि आरक्षणाची बाब लक्षात घेऊन चार सदस्यीय प्रभाग पद्धती नेमली. आता केवळ राजकीय हेतूने ती पुन्हा वार्डपद्धतीमध्ये रुपांतरीत करण्यात येत असल्याचा आरोप करीत, त्यास विरोध असल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले. 

यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनीही कुठलीही निवडणूक नसताना इतकी घाई का? असा प्रश्‍न निर्माण केला.

हाच धागा पकडून पृथ्वीराज चव्हाण यांनी विविध दाखले देत, महापालिकेत दोन सदस्यांचा प्रभाग आणि नगरपालिकेसाठी एका सदस्याचा वार्ड असावा अशी सूचना केली. मात्र, त्यासाठी घाई न करता तो प्रस्ताव संयुक्त समितीकडे पाठविण्याची मागणी केली.

याला अजित पवार यांनी विरोध करीत, वार्ड पद्धती योग्य असल्याने विधेयक मंजूर करण्याची मागणी केली. 

त्यामुळे सभागृहात राष्ट्रवादी विरुद्ध कॉंग्रेस असे चित्र निर्माण झाले होते. दरम्यान मात्र, यावेळी सत्ताधाऱ्यांकडून विकास ठाकरे, दिलीप लांडे यांच्यासह इतर आमदारांनी चार सदस्यीय प्रभाग पद्धती रद्द करण्याला समर्थन दिल्याने प्रस्तावाला सभागृहात मंजूरी देण्यात आली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com