पुणे : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सुरू असून चव्हाण यांच्यासमोर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष किंवा राष्ट्रीय महासचिव असे दोन पर्याय श्रेष्ठीनी ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले.
चव्हाण यांचा महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात समावेश होईल अशी शक्यता होती. चव्हाण यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपद द्यायचे असेही बोलले जात होते. मात्र या सगळ्या चर्चा घडवून आणल्या गेल्या, असे चव्हाण यांनी माध्यमांशी तसेच कार्यकर्त्यांशी बोलताना स्पष्ट केले. काँग्रेसच्या वाट्याला ग्रामीण भागाशी संबधित खाती न आल्यानेही चव्हाण मंत्रिपदाच्या स्पर्धेतून स्वतःहून बाहेर पडले असेही तेव्हा सांगण्यात येत होते.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा समावेश मंत्रिमंडळात झाल्यावर त्यांच्या जागी चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू होती.गेल्या काही दिवसात ही चर्चा बंद होती पण पुन्हा एकदा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी चव्हाण यांची निवड होणार असल्याची चर्चा जोर धरत असून चव्हाण यांच्या निकटवर्तीयांनी या चर्चेला दुजोरा दिला आहे. पक्षश्रेष्ठींनी चव्हाण यांच्यापुढे राष्ट्रीय महासचिव आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हे दोन पर्याय ठेवले असून चव्हाण यांनी राज्याच्या पर्यायाला पसंती दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.