पृथ्वीराज चव्हाण इंटर कौन्सिल परिषदेत

यापूर्वी भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांना निमंत्रण देण्यात येत असे . चव्हाण यांना आमंत्रित करण्याची ही दुसरी वेळ आहे.
Prithviraj-Chavan.
Prithviraj-Chavan.

मुंबई : जगासमोरच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी माजी राष्ट्रप्रमुख आणि राज्यप्रमुखांच्या इंटरऍक्‍शन कौन्सिल गटात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आमंत्रित करण्यात आले होते.

 स्मार्ट सिटीजचे पुढचे पाउल असणारे वाईज सिटीज , तेल संकट तसेच ग्लोबल वार्मिंग या विषयावर कोलंबिया येथे झालेल्या या गटाच्या चर्चेत पृथ्वीराज चव्हाण यांना विशेष बोलावणे पाठवण्यात आले होते. यापूर्वी भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांना निमंत्रण देण्यात येत असे . चव्हाण यांना आमंत्रित करण्याची ही दुसरी वेळ आहे.

जगाला भेडसावरणाऱ्या स्थलांतरितांवर समस्या काय , ग्लोबल वार्मिंगचे आरोग्यावर होणारे परिणाम लक्षात घेता मनुष्याने करावयाचे बदल यावर गेले तीन दिवस सखोल चर्चा करण्यात आली. या कौन्सिलमध्ये जागतिक दर्जावर प्रमुखांचे काम केलेल्या महत्वाच्या उच्चशिक्षित नेत्यांना बोलावले जाते. पृथ्वीवरच्या समस्या हाताळायला या मंडळींचा अनुभव कामी येतो असे या कौन्सिलचे मत आहे.

 आयर्लंडचे माजी प्रमुख बर्टी अहेर्न , नायजेरियाचे माजी प्रमुख ओल्यीस्नज तसेच नॉर्वे, न्यूझीलंड, माल्टा, गिनीया , बोलिव्हीया आणि युक्रेनचे माजी प्रमुख या वेळी हजर होते. राज्याच्या माजी प्रमुखांना निमंत्रित म्हणून बोलावण्यात येते ,त्यात पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com