हे सरकार अल्पजीवी, भाजपच पुन्हा सत्तेवर येणार : प्रीतम मुंडे 

माजलगाव येथे पक्ष कार्यकारीणी निवडीच्या बैठकीत डॉ. प्रितम मुंडे यांनी पुन्हा भाजप सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केला.
Pritam-Munde-at-beed.
Pritam-Munde-at-beed.

माजलगाव (जि. बीड) : सध्या राज्यात सत्तेवर असलेले सरकार हे तीन भिन्न विचारसरणी असल्याने ते जास्तकाळ राहणार नाही. अल्पजीवी सरकार केंव्हाही पायउतार होईल आणि पुन्हा भाजपच सत्तेवर येईल, असा विश्वास भाजपच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी व्यक्त केला.

यामुळे कार्यकर्त्यांनी जीव ओतून पक्ष संघटन मजबूत करावे असे आवाहन देखील त्यांनी केले.कार्यकारणी निवडीच्या बैठकीत डॉ. प्रितम मुंडे यांनी पुन्हा सरकार येणार असल्याचे सांगून कार्यकर्त्यांमध्ये उमेद जागविण्याचा प्रयत्न केला. 


भाजपचे जेष्ठ नेते रमेशराव आडसकर, जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, सुभाष धस, मोहन जगताप, राम कुलकर्णी, नितीन नाइकनवरे, हनुमान कदम अरुण राऊत, डॉ. अशोक तिडके, संतोष यादव, सुरेश दळवे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.


विरोधी पक्षात असल्याने पक्ष, संघटन मजबूत करणे गरजेचे आहे. पक्षाची ताकद वाढली तरच सत्ताधाऱ्यांना सक्षम तोंड देता येईल असेही डॉ. मुंडे म्हणाल्या. त्यामुळे संघटनेत जीव ओतून पक्षाचे काम करणारे पदाधिकारी निवडणार असल्याचेही त्या म्हणाल्या.


जनतेने भाजपलाच कौल दिला, परंतु ऐनवेळच्या घडामोडीमुळे सत्तेत येता आले नाही. भाजपला विरोध म्हणून भिन्न विचारसरणीच्या तीन पक्ष एकत्र आल्याचेही डॉ. प्रितम मुंडे म्हणाल्या. तरीही हे सरकार अल्पजीवी असून कधीही पायउतार होऊ शकते असे त्या म्हणाल्या.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com