गर्दी रेकॉर्ड ब्रेक आहे, आडसकरांनाही रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून द्या : प्रीतम मुंडे 

भाजप सरकारने महिलांचा सन्मान केला आहे; मी आमदार झाल्यानंतर यापुढेही महिलांच्या सुरक्षततेची काळजी प्राधान्याने घेऊन प्रत्यक्षात रामराज्याप्रमाणे कारभार करेल.- रमेश आडसकर
Ramesh Adaskar Preetam_ Munde.
Ramesh Adaskar Preetam_ Munde.

माजलगाव : लोकसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यातील मतदारांनी माझ्यावर खूप मोठे प्रेम दाखवून विरोधकांच्या अपेक्षा भंग करीत पावणेदोन लाख मतांनी निवडून दिले. आजच्या मेळाव्यालाही महिलांची रेकॉर्डब्रेक गर्दी आहे.

एव्हड्याच रेकॉर्डब्रेक मतांनी रमेश आडसकरांना निवडून देणार का ? असे खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी म्हणताच उपस्थित हजारो महिलांनी दोन्ही हात वर करून होकार देत त्यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. भाजप सरकारनेच महिलांचा सन्मान केला असून यापुढेही होईल असे आश्वासन डॉ. मुंडे यांनी दिले. 

केंद्र, राज्यातील भाजप सरकारने राज्यातील महिलांना सन्मान देण्याचे काम केले आहे. महिला सक्षमीकरणाचा अजेंठा प्रभावीपणे राबवित असल्यानेच एकट्या बीड जिल्ह्यात जवळपास ३० हजार बचतगट स्थापन झाले असून ते अत्यंत उत्तम प्रकारे सुरु आहेत. यासारख्या विविध माध्यमातून भाजपनेच नारीशक्तीचे सक्षमीकरण केले असल्याचे खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी सांगितले.


भाजप, शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार रमेश आडसकर यांच्या प्रचारार्थ सोमवारी (ता. १४) आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर सुमन ताई मुंडे, गौरी देशमुख, रुपाली कचरे, संजीवनी राऊत, प्रतीक्षा मुळे आदी उपस्थित होत्या.


पुढे बोलताना खासदार डॉ. मुंडे म्हणाल्या की, बचत गटाच्या माध्यमातून राज्यातील हजारो महिला स्वतःच्या पायावर उभा राहून कुटुंबाला आधार देत आहेत, हेच या भाजप सरकारचे यश आहे. या सरकारने महिलांच्या समस्याला प्राधान्य देऊन त्या सोडविण्याचे काम पहिल्यांदा केले आहे. पंतप्रधान उज्वला गॅस योजना प्रभावीपणे राबवून महिलांची धुरापासून सुटका करण्याचे काम या सरकारने केले आहे. 


घरकुलाच्या माध्यमातून राज्यातील गोर गरीब जनतेला त्यांच्या हक्काचे घर उपलब्ध करून दिले. गरीब रुग्णांना न परवडणारे उपचार देण्याचे काम जीवनदायी योजनेतून केले आहे. सारख्या कल्याणकारी योजना यापुढेही राबविण्यासाठी, पालामंत्री पंकजा मुंडे यांचे हात बळकट करण्यासाठी रमेश आडसकर यांना विजय करा असे आवाहन डॉ. मुंडे यांनी महिला मेळाव्यात केले.

भाजपचे उमेदवार रमेश आडसकर यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या महिला मेळाव्याला रेकॉर्डब्रेक गर्दी झाली होती. मतदारसंघातील कानाकोपऱ्यातून महिला आल्याने शिवप्रताप मंगलकार्यालय अपुरे पडले होते. यामुळे अनेक महिलांनी बाहेर उभा राहून डॉ. प्रीतम मुंडे यांचे भाषण ऐकले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com