खासदार डॉ. प्रीतम मुंडेंकडून अबुधाबीत पर्यावरण संसदेत भारताचे प्रतिनिधित्व....

खासदार डॉ. प्रीतम मुंडेंकडून अबुधाबीत पर्यावरण संसदेत भारताचे प्रतिनिधित्व....

बीड : विश्वामध्ये होत असलेल्या पर्यावरण बदलाच्या दुष्परिणामाला रोखण्यासाठी जागतिक पातळीवर पावले उचलली जात आहेत. पर्यावरण समतोल राखण्यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत. याचाच भाग म्हणून अबुधाबी येथे तीन दिवसीय जागतिक पर्यावरण संसद (climet parliment) सुरु आहे. यात बीडच्या भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे भारताचे प्रतिनिधीत्व करत आहेत. 

या जागतिक परिषदेला जगभरातील पर्यावरण तज्ज्ञ, अभ्यासक, विविध देशांचे लोकप्रतिनिधींचा सहभाग आहे. भारतातून सहभागी झालेल्या निवडक खासदारांमध्ये डॉ. प्रितम मुंडे यांचा सहभाग आहे. शुक्रवार पासून सुरु झालेली ही पर्यावरण संसद रविवार पर्यंत चालणार आहे. परिषदेत उर्जा वायदा, ग्रीन ग्रीड, इलेक्‍ट्रीक पाककला, आणि जागतिक उर्जा संक्रमण किंवा अक्षय उर्जा आणि स्वच्छ पाककला या परिसंवादात डॉ. प्रीतम मुंडे यांनी सहभाग घेत आपले मत नोंदविले. 

भारतात स्वच्छ पाककला (Clean cooking) विषयी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या उज्वला योजनेच्या व्याप्तीमुळे भारत देशातील सौर ऊर्जा हा शाश्वत उपाय आहे असे मत त्यांनी या परिसंवादात मांडले. त्याच बरोबर सर्व सरकारी इमारतीत सौर ऊर्जेची वापर सक्तीचा असावा, लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही केवळ भाषण न करता लोकांसमोर उदाहरण म्हणून उभे राहिले पाहिजे, वातावरणात कार्बन डायऑक्‍साईडसह ग्रीन हाऊस गॅसेसच्या वाढत्या प्रमाणामुळे तापमान वाढीचे दुष्परिणधाम नैसर्गिक आपत्तींना आमंत्रण देतात त्यामुळे अशा पर्यावरण संसदेसारखे उपक्रम बदल घडवितात असे मतही खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com