ब्रिटनचे फायटर पंतप्रधान जाॅन्सन कोरोनामुळे `आयसीयू`त : देशात चिंतेचे वातावरण

ब्रिटनसह युरोपीय देशांत चिंतेचे वातावरण
boris johnoson
boris johnoson

लंडन : कोरोनाबाधित ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जाॅन्सन यांना अतिदक्षता विभागात दाखल केल्याने अख्खा देश हादरला आहे. जाॅन्सन यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी राणी एलिझाबेथ यांना देशाला उद्देषून भाषण केले. हा योगायोग मानला जात आहे.

युरोपातील देश कोरोनाशी मुकाबला करत आहेत. इटली, स्पेन, फ्रान्स आणि त्यानंतर ब्रिटनमध्ये या विषाणूने तेथील सारी व्यवस्था कोलमडून टाकली आहे. त्यात ब्रिटनच्या पंतप्रधानांनाच कोरोनाचा संसर्ग झाल्याने वादळ उठले होते. आता त्यांना आयसीयूत दाखल केल्याने चिंता आणि भीती तेथे निर्माण झाली आहे. 

जाॅन्सन यांना आॅक्सिजन दिला असला तरी ते व्हेंटिलेटवर नाहीत, असे सांगण्यात आले. तसेच ते पूर्णपणे शुद्धीत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. कोरोनाचा संसर्ग झाल्याचे 27 मार्च रोजी स्पष्ट झाल्यानंतर जाॅन्सन हे आपल्या शासकीय निवासस्थान असलेल्या 10, डाऊनिंग स्ट्रीट येथूनच कारभार पारत होते. ते होम क्वारंटाईन झाले होते. सोमवारी सकाळपर्यंत त्यांनी कोरोनाविषयी अधिकाऱ्यांना मार्गदर्शनही केले. त्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. परराष्ट्रमंत्री डाॅमिनिट राॅब यांच्याकडे थेट सूत्रे देण्यात नसली तरी ते जाॅन्सन यांना मदत करतील, असे अधिकृत पत्रकात म्हटले आहे.

55 वर्षीय असलेले जाॅन्सन फायटर किंवा योद्धे म्हणून ओळखले जातात. परिस्थितीने उभे केलेले आव्हान परतवून टाकण्याची क्षमता असलेला म्हणून त्यांनी ओळख आहे. त्यांनी महिनाभरापूर्वीच झालेल्या निवडणुकीत हुजूर पक्षाला मोठा विजय मिळवून दिला होता. ब्रिटनला युरोपीयन महासंघातून बाहेर काढण्याचे आश्वासन त्यांनी देशाला दिले होते. ब्रेक्झिटवरून देशात गेले साडेतीन वर्षे राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेचे वातावरण आहे. त्यात जाॅन्सन यांना आयसीयूत हलविण्याची बातमी आल्यानंतर त्याचा परिणाम पौंड घसरण्यात झाला.

राॅब यांनी सोमवारी कोरोनासंंबंधित उपाययोजनांसाठीची बैठक घेतली. त्यांनी जाॅन्सन यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगत ते बेडवरून परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचाही दावा केला. मात्र त्यांच्याशी आपले शनिवारपासून बोलणे झाले नसल्याचेही पुढे सांगितल्याने त्याचे वेगवेगळे अर्थ काढण्यात येत आहेत. योगायोगाचा भाग म्हणजे जाॅन्सन यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी राण एलिझाबेथ यांनी देशवासियांशी संवाद साधला. दुसऱ्या महायुद्धात जनतेने स्वयंशिस्त आणि संयम जसा राखला तसेच कोरोनाच्या संकटातही राखण्याचे आवाहन राणीने केले. राणीच्या संवादानंतर नागरिकांनी कुठे धीर येत असतानाचा जाॅन्सन यांच्या बातमीने पुन्हा धक्का बसला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com