ठाणे महापालिका आयुक्तांविरूध्द हक्कभंग दाखल करणार- धनंजय मुंडे

 ठाणे महापालिका आयुक्तांविरूध्द हक्कभंग दाखल करणार- धनंजय मुंडे

मुंबई - ठाण्याच्या कळवा भागातील गरीबांच्या तीन हजार झोपडपट्या नियमबाह्य रित्या हटवण्याच्या कारवाईस मुख्यमंत्री आणि विधान परिषद सभापती यांनी स्थगिती दिली असतांनाही त्यांचे आदेश डावलणार्‍या ठाणे महानगर पालिका आयुक्तांविरूध्द हक्कभंग दाखल करणार असल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली आहे. 
    
        मुंडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार ठाण्याच्या कळवा भागातील शासनाच्या जागेवरील तीन हजार झोपडपट्या काढण्याची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त संजीव जैस्वाल यांनी सुरू केली होती. राष्ट्रवादी काँसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सुचनेवरून सदर कारवाई थांबविण्याबाबत धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेवुन मागणी केली असता मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या समक्ष आयुक्तांना या झोपडपट्या हटवण्याच्या कारवाईस स्थगितीचे आदेश दिले होते. सभागृहात मुंडे यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे हा विषय उपस्थित करून आयुक्तांमार्फत होणारी कारवाई थांबवण्याची मागणी केली असता त्याची दखल घेवुन याबाबत आपल्या दालनात बैठकीद्वारे निर्णय होत नाही तो पर्यंत झोपडपट्या हटवण्याची ही कारवाई स्थगित करण्याचे निर्देश त्यांनी विधान परिषदेत दिले होते. 


तरीही आयुक्तांनी कारवाई पुढे रेटली. त्यामुळे आज मुंडे यांनी  प्रसिध्दी पत्रकाद्वारे आयुक्तांच्या या कृतीबद्दल नाराजी व्यक्त करून मुख्यमंत्री व सभापतींचे निर्देश डावलणार्‍या आयुक्तां विरूध्द हक्कभंग दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. 
    'चार वर्षापुर्वी ठाण्यातील अनधिकृत इमारती पाडण्याचे असेच आदेश झाले असतांना सदर कारवाई करू नये यासाठी ठाण्यातील शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेवुन याप्रकरणी मध्यस्थी करण्याची विनंती केली होती. त्यावेळी पवार यांनी ठाण्याचा दौरा करून पत्रकार परिषद घेऊन आघाडीचे सरकार असतांनाही या अनधिकृत इमारती पाडता येणार नाहीत. आधी पुनर्वसन करा आणि नंतरच अनधिकृत इमारती पाडा अशी भुमिका घेतल्याने तत्कालीन आघाडी सरकारने ती कारवाई थांबवली होती.' असेही मुंडे यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com