राष्ट्रपती निवडणूक : शिवसेनेची सावध भूमिका

राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेनेची अजून भूमिका निश्चित नाही. अमित शाह यांना उद्धव ठाकरे यांना फोन करून रामनाथ कोविंद यांचे नाव निश्चित केली असल्याचे सांगितले. अमित शाह यांनी पाठिंबा मागितला असून शिवसेना एकदोन दिवसात आपली भूमिका स्पष्ट करेल अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
राष्ट्रपती निवडणूक : शिवसेनेची सावध भूमिका

मुंबई- राष्ट्रपती निवडणुकीसाठी शिवसेनेच्या भूमिकेकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मात्र, आज एनडीएच्या उमेदवाराची घोषणा होताच शिवसेनेने सावध भूमिका घेत दोन दिवसात पुढची भूमिका जाहिर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेनेची अजून भूमिका निश्चित नाही. अमित शाह यांना उद्धव ठाकरे यांना फोन करून रामनाथ कोविंद यांचे नाव निश्चित केली असल्याचे सांगितले. अमित शाह यांनी पाठिंबा मागितला असून शिवसेना एकदोन दिवसात आपली भूमिका स्पष्ट करेल अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी सांगितले. भाजपप्रणित एनडीएचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केली. त्यावर शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना राऊत माध्यमांशी बोलत होते.

खासदार संजय राऊत म्हणाले, ''बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद भाजपप्रणित एनडीएचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केल्यानंतर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून माहिती दिली. त्यावेळी शाह यांनी शिवसेनेचा पाठिंबा मागितला आहे.  शिवसेनेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत किंवा एस. एम स्वामिनाथन यांची नावे सुचवली होती. मात्र, भाजपने त्यांचा उमेदवार घोषित केला आहे. त्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्षपदाधिकाऱ्यांची बैठक घेवून निर्णय जाहिर करतील असे राऊत यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com