चंद्रकांतदादा, तुमच्या १६ मंत्र्यांसाठी कोठडीची सोय करा : मुंडे

चंद्रकांतदादा, तुमच्या १६ मंत्र्यांसाठी कोठडीची सोय करा : मुंडे

‌पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस जनतेच्या प्रश्नासाठी ज्या वेळी आंदोलन करते त्या वेळी सरकार सत्तेचा वापर करून आम्हाला धमकी देण्याचे काम करते. चंद्रकांत दादा पाटील यांनी आम्हाला धमकी देण्यापेक्षा स्वतःच्या मंत्रिमंडळातील 16 भ्रष्ट मंत्र्यांच्या कोठडीची सोय करून ठेवावी असा पलटवार विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. 

‌मुंबईतील भाजपाच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अटकेत असलेले माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याशेजारी चार-पाच कोठडी रिकाम्या असल्याचा इशारा देत राष्ट्रवादीच्या नेत्यांना कारवाईचा संकेत दिले आहेत.

पाटील यांच्या टिकेला पंढरपूर येथे पत्रकार परिषदेत प्रतिउत्तर देतांना धनंजय मुंडे म्हणाले की  आजच्या दिवशी स्थापना दिवस साजरा करण्यापेक्षा चार वर्षे जनतेची फसवणूक करणा-या (फूल बनवणा-या ) भाजपाने आपला स्थापना दिवस 6 एप्रिल ला नाहीतर 1 एप्रिल या `एप्रिल फुल` दिवशी साजरा करायला हवा होता. आज 28 रेल्वे द्वारे माणसे आणून भाजपा आता स्वतःचीच फसवणूक करत आहे.

शिवसेनेने सत्तेचा लाभ घेऊन पुन्हा केवळ जनतेला दाखवण्यासाठी विरोधी भूमिका नेहमीच घेतली आहे. या दूटप्पी भूमिकेला अजितदादा यांनी गांडूळासारखे दुतोंडी म्हटले तर बिघडले कुठे, असा सवाल त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात केला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नादी लागू नये, तसे झाल्यास ते औषधालाही पुरणार नाहीत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील मेळाव्यात पवारांवर आगपाखड केली. मुख्यमंत्र्यांनी पवारांना लक्ष करीत, राष्ट्रवादीला "औषधाचा डोस' दिल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आता मुख्यमंत्री फडणविसांना नेमके कोणते "इंजेक्‍शन' याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.

महाराष्ट्रात आपली ताकद वाढविण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये हल्लाबोल आंदोलनात आक्रमक भूमिका घेतला आहे. अन्य राजकीय पक्षांपेक्षा भाजप नेत्यांवरच राष्ट्रवादीच्या नेत्यांचा अधिक रोष असल्याचे त्यांच्या भाषणारून दिसून येत आहे. त्यात मुख्यमंत्र्यांची टिकाही राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागणारी आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, जयंत पाटील मुख्यमंत्र्यांचा हल्ला कसा परतवून लावणार, हे औत्सुक्‍याचे ठरले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com