मनेका गांधी यांचा मुनगंटीवारांवरील आरोप प्रेमसाई महाराजांच्या इशाऱ्यावरून - तिवारी

 मनेका गांधी यांचा मुनगंटीवारांवरील आरोप प्रेमसाई महाराजांच्या इशाऱ्यावरून - तिवारी

वाशीम : अवनी या नरभक्षक वाघीणीच्या मृत्यूनंतर राज्यात अद्यापि आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. वाशीम यवतमाळ लोकसभा मतदार संघातही अवनीवरून राजकीय शरसंधानाला सुरवात झाली आहे. अध्यात्मिक गुरु प्रेमासाई महाराजांच्या इशाऱ्यावरून केंद्रीय पर्यावरण मंत्री मनेका गांधी यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीका केल्याचा आरोप शेती स्वालंबन मिशनचे किशोर तिवारी यांनी केला आहे. दुसरीकडे प्रेमासाई महाराजांनी कोण किशोर तिवारी असा पवित्रा घेतला आहे. यामुळे मतदार संघातील वातावरण भलतेच तापले आहे. 

वाशीम यवतमाळ लोकसभा मतदार संघात आध्यात्मिक गुरु प्रेमासाई महाराज इच्छूक भाजपकडून आहेत. त्यांची राजकीय इच्छा त्यांनी जगजाहीरही केली आहे. त्यादृष्टीने त्यांचा जनसंपर्क सुरू आहे. अवनी वाघीणीला वनविभागाने ठार केले, ती वाघीण नरभक्षक असल्याने तिला ठार केले असा दावा वनविभागाने केला असला तरी वन्यप्रेमी तथा विरोधी पक्षांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर हल्ला चढवला आहे. हा वाद राज्यस्तरीय असतांना केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टिका केल्याने हे प्रकरण दिल्ली दरबारात चर्चेला आले. 
अध्यात्मिक गुरु प्रेमासाई महाराजांच्या इशाऱ्यावरून केंद्रीय पर्यावरण मंत्री मनेका गांधी यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीका केल्याचा आरोप 
आता या प्रश्नावर शेती स्वालंबन मिशनचे किशोर तिवारी यांनी केला आहे. प्रेमासाई महाराजांच्या उमेदवारीसाठी मनेका गांधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दवाब बनविण्यासाठी या प्रकरणाचा उपयोग करीत असल्याचा आरोप तिवारी यांनी केल्याने यवतमाळ व वाशीम जिल्ह्यातील राजकारण भलतेच तापले आहे. 

या प्रकरणाबाबत प्रेमासाई महाराजांनी कोण किशोर तिवारी असा पवित्रा घेवून आपण त्यांना ओळखतच नसल्याचे सांगून हे प्रकरण मनेका गांधी व सुधीर मुनगंटीवार तसेच वनविभागाशी संबंधीत असल्याचे सांगितले आहे. प्रेमासाई महाराज हे मनेका गांधी, राजनाथसिंह आणि वरूण गांधी यांचे आध्यामिक गुरु असल्याने किशोर तिवारी यांच्या आरोपाने अवनीच्या प्रकरणातील गुढ वाढत चालले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com