नगराध्यक्ष झाडेंचा स्वपक्षीयांनीच केला घात ?

वाडीचे नगराध्यक्ष प्रेमनाथ झाडे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने केलेली कारवाई राजकीय सुडभावनेतून करण्यात आली आहे. मागील वर्षभरापासून नगराध्यक्ष पद सोडण्यासाठी स्वपक्षीय पदाधिकारी व नगरसेवक त्यांच्यावर दबाव टाकत होते. त्याच यशस्वी होत नसल्याने लाच प्रकरणातफसवण्यात आल्याचा आरोप झाडे यांच्या पत्नी प्रज्ञा यांनी केला.
नगराध्यक्ष झाडेंचा स्वपक्षीयांनीच केला घात ?

नागपूर : वाडीचे नगराध्यक्ष प्रेमनाथ झाडे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने केलेली कारवाई राजकीय सुडभावनेतून करण्यात आली आहे. मागील वर्षभरापासून नगराध्यक्ष पद सोडण्यासाठी स्वपक्षीय पदाधिकारी व नगरसेवक त्यांच्यावर दबाव टाकत होते. त्याच यशस्वी होत नसल्याने लाच प्रकरणात
फसवण्यात आल्याचा आरोप झाडे यांच्या पत्नी प्रज्ञा यांनी केला.

शुक्रवारी वाडी नगरपरिषदचे नगराध्यक्ष प्रेमनाथ झाडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने 20 हजारांची लाच घेताना अटक केली. तक्रारकर्त्यांनी जरी वेतन काढून देण्याचे कारण पुढे केले आहे. या कारवाईनंतर वाडीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सकाळी 10 वाजता कारवाईनंतर प्रेमनाथ
झाडे यांच्या दत्तवाडी येथील निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने झाडाझडती सुरू केली. घटनेची माहिती सर्वत्र पसरताच नागपूर जिल्ह्यातील भाजपा व इतरही पक्षासोबत नगरपरिषद कार्यालय व सोशल मीडियाच्या माध्यमातून दिवसभर आरोप प्रत्यारोपाच्या चर्चांना उधाण आले. वाडीसह संपूर्ण जिल्ह्यात हिच चर्चा होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रेम झाडे यांचे घर ताब्यात घेऊन सकाळी 11 वाजतापासून झाडाझडती सुरू केली. त्यांच्या चल-अचल संपत्तीची माहिती गोळा केली. घटनेची माहिती इतर पक्षांतील पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताच ते राजकीय षडयंत्राचे बळी ठरल्याचा तर्कवितर्क सुरू झाला. या घटनेचा सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त केला. या घटनेने वाडीतील भाजपाच्या दोन गटांतील संघर्ष चव्हाट्यावर
आल्याची चर्चा परिसरात सुरू झाली आहे. याचा परिणाम आगामी वाडी नगर परिषदेच्या निवडणुकीवर पडणार असल्याचीही चर्चा रंगली आहे.

प्रेम झाडेंच्या पत्नी प्रज्ञा म्हणाल्या, की नगराध्यक्ष पद सोडण्यासाठी मागील एक वर्षांपासून स्वपक्षीय पदाधिकारी त्यांच्या मागे लागले होते. त्यांनी वाडीच्या विकासाला न्याय देण्यासाठी जिल्हा महामंत्री पदाचाही त्याग केला. नगराध्यक्षपदाचा राजीनामा देत नसल्याने भाजपच्या पक्षांतर्गत विरोधकंनी त्यांना अडकवले. भाजपाने खालच्या स्तरावरील राजकारण केले आहे. एक सामान्य कंत्राटदार मोठे रोजकीय पाठबळ असल्याशिवाय अशी हिंमत तेव्हाच करू शकत नाही. या कंत्राटदाराचा बोलविता धनी या मतदारसंघातील भाजपचा एक बडा नेता असल्याचे प्रेमनाथ यांचे भाऊ रुपेश म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com