Vitthalrao Vikhe Patil
Vitthalrao Vikhe Patilsarkarnama

...म्हणून थोरातांच्या कारखान्यात विखे होते चेअरमन

अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात विखे व थोरात हे दोन्ही राजकीय दृष्ट्या मातब्बर घराणी समजली जातात.

अहमदनगर : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात विखे व थोरात हे दोन्ही राजकीय दृष्ट्या मातब्बर घराणी समजली जातात. या दोन्ही घराण्यांच्या राजकीय अस्तित्त्वात सहकाराचा (Co-operative) मोठा वाटा आहे. या दोन्हीही कुटुंबात अनेक वर्षांपासून राजकीय वाद आहे. मात्र, असे असले तरी थोरात कुटुंबाचे वर्चस्व असलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यावर (Co-operative Sugar Factory) विखे कुटुंबातील एक व्यक्ती सुरवातीची दोन वर्षे अध्यक्ष होते.

पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, अर्थतज्ज्ञ डॉ. धनंजयराव गाडगीळ व वैकुंठभाई मेहता यांनी 1950-51ला प्रवरा सहकारी साखर कारखाना (Sugar Factory) सुरू केला. हा आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना आहे. या धर्तीवर राज्यात सहकारातून शेतकऱ्यांच्या आर्थिक क्रांतीचे वारे वाहू लागले. यातूनच राहुरी, कोळपेवाडी, अशोकनगर येथील सहकारी साखर कारखाने सुरू झाले. अकोले, संगमनेर व सिन्नर तालुक्यातील नेत्यांनी एकत्र येत सहकारी साखर कारखाना सुरू करण्याचे ठरविले. यात संगमनेर तालुक्यातील माजी आमदार कॉम्रेड दत्ता देशमुख, माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील, भाऊसाहेब थोरात, भास्करराव दुर्वे, अकोले तालुक्यातील कॉम्रेड बुवासाहेब नवले, तत्कालीन आमदार यशवंतराव भांगरे, अमृतभाई मेहता, पी. जी. भांगरे आदी नेते अग्रेसर होते.

Vitthalrao Vikhe Patil
'ग्लोबल टीचर' डिसले गुरूजी आता थेट अमेरिकेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार!

या नेत्यांनी कारखान्यासाठी शेअर्स गोळा केले. त्यांनी दिल्लीतून कारखान्यासाठी मान्यता आणण्या ऐवजी वेगळीच शक्कल लढविली. त्यांनी बारामती परिसरातील संवत्सर येथील 800 टन प्रतिदिन गाळप करणारा बंद साखर कारखाना विकत घेतला. त्यातील मशिनरी व इतर साहित्य आणून तीन तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या संगमनेर येथे कारखान्याची 1967-68 मध्ये उभारणी केली. या कारखान्याला नाव दिले संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना. या साखर कारखान्याचे पुढे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना असे नामकरण झाले. मात्र, राज्य सरकारच्या तत्कालीन नियमानुसार या कारखान्याच्या उभारणीतील एकही संचालक नेता या कारखान्याचा संचालक होऊ शकणार नव्हता.

Vitthalrao Vikhe Patil
'व्हॅलेंटाईन डे'ला वाझे देणार देशमुखांना धोका? स्वतःची सुटका करुन घेण्यासाठी आखला प्लॅन

सरकारच्या नियमानुसार नवीन कारखान्याच्या पहिल्या दोन हंगामासाठी कारखाना चालविण्याचा अनुभव असलेल्या शेजारच्या कारखान्याचे अध्यक्ष हे नवीन कारखान्याचे अध्यक्ष राहतील. संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याच्या जवळ प्रवरा साखर कारखाना होता. प्रवरा कारखान्यावर पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील अध्यक्षपदी होते. त्यामुळे संगमनेर भाग कारखान्यावरही त्यांनाच पहिले दोन हंगाम अध्यक्ष करण्यात आले. त्यांनी त्यांच्या अनुभवाच्या जोरावर या कारखान्याची प्रशासकीय घडी बसविली. संदर्भ : साखर गुलामी-लेखक दशरथ सावंत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in