`माझ्या रक्तात भाजप...शेवटही भाजपतच!`

..
pravin pote patil clears the air
pravin pote patil clears the air

अमरावती : अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं वृत्त समाज माध्यमांवर व्हायरल होताच जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.

प्रवीण पोटे पाटील आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात असलेल्या नाराजीमुळे, प्रवीण पोटे भाजप सोडून काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे एका सोशल मिडियाच्या पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे. पोटे पाटील यांच्याशी याबद्दल चर्चा केली असता त्यांनी अशा प्रकारचे वृत्त म्हणजे खोडसाळपणा असून आपण असे वृत्त पसरविणाऱ्याच्या विरोधात तक्रार करणार असल्याचं यांनी सांगितलं. आज दिवसभर चाललेल्या या सर्व गोंधळावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
 
''भाजपने २०१२ मध्ये आमदारकी दिली २०१४ मध्ये देवेंद्रजी फडणवीस व गडकरी साहेबांनी मला कोणताही राजकीय अनुभव, खानदानी राजकीय पाठबळ नसतांना मला मंत्री केले. याची मला जाणीव आहे, असे पोटे यांनी स्पष्ट केले.

 मी अमरावती मध्ये २०१२ मध्ये मी पक्षात सक्रिय झाल्यानंतर भाजपा मध्ये कोणताही गट होऊ दिला नाही व मी सुद्धा गट केला नाही. पक्ष मोठा करण्याचे व भाजपा सदस्य वाढविण्याचे काम मी केले आहे. भाजपा विचारांचा मी माणूस आहे. मी भाजपात कुठल्या दुस-या पक्षातुन आलो नाही. शिवसेना, काॅंग्रेस किंवा राष्ट्रवादीतुन येऊन मी भाजपाची आमदारकी घेतलेली नाही. कोणतेही दबावतंत्र वापरुन मंत्री झालो नव्हतो. भाजपमध्ये तुमचे काम पाहून संधी मिळत असते. दुस-या पक्षात असे होत नाही. तेथे वशिला लावावा लागतोय. म्हणून माझा जन्म हा भाजपसाठीच झाला आहे. काही उपद्रवी लोक आहेत ज्यांनी माझी प्रतिमा खराब करण्याच्या दृष्टिने ही वार्ता सोशल मीडियात टाकली आहे. मी पोलीस आयुक्तांकडे अर्ज दिला आहे...मी भाजपा भाजपा भाजपा',' असे त्यांनी आपल्या निवेदनात शेवट म्हटले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com