प्रविण परदेसी मुंबई पालिका आयुक्त? - Pravin Pardeshi all set to become Mumbai corporation's commissioner | Politics Marathi News - Sarkarnama

प्रविण परदेसी मुंबई पालिका आयुक्त?

समीर सुर्वे 
शुक्रवार, 10 मे 2019

मुंबई : मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी बढती देण्यास निवडणुक आयोगाने परवानगी दिली आहे. तर,पालिका आयुक्तपदी प्रविणसिंह परदेसी यांची नियुक्ती होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे . 

मुख्यमंत्री कार्यलयात परदेसी अतिरीक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. मुंबईसह काही महानगरच्या विकास आराखड्याला अंतिम रुप देण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. परदेसी हे मुख्यमंत्र्याचे अत्यंत जवळचे सनदी अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांची वर्णी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी  लागणार हे  नक्की मानले जात आहे .त्यांच्यावर जेष्ट सनदी अधिकारी मनुकूमार श्रिवास्तव, राजीव जलोटा,आर.ए.राजीव ही आयुक्त पद्च्या स्पर्धेत आहेत.

अजोय मेहता हे सप्टेंबर महिन्यात निवृत्त होणार आहेत .राज्याच्या इतिहासात सर्वात कमी कालवधी साठी मुख्य सचिव बनण्याचा विक्रम ते करणार आहेत. विद्यमान मुख्य सचिव युपीएस मदान यांचीी नियुक्ती सीकॉमच्या अध्यक्षपदी केली जाणार असून ते मुख्यमंत्र्यांचे सल्लागार म्हणूनही काम पाहणार असल्याचे समजते . 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख