घरकुल' निकालाच्या यशाचा आनंद  वेगळाच  :डॉ प्रवीण गेडाम

डॉ.प्रवीण गेडाम हे जळगाव महापालिकेचे सन 2005 मध्ये पहिले आय.ए.एस.दर्जाचे आयुक्त होते. घरकुल गैरव्यवहार प्रकरणी त्यांनी गुन्हा दाखल केला होता.
Pravin-Gedam
Pravin-Gedam

जळगाव : एखाद्या गोष्टीचा पाया रचला आणि त्यात यश मिळालं तर त्याचा आनंद वेगळाच असतो. तो घरकुल प्रकरणाच्या निकालाने आपण अनुभवत आहोत अशी प्रतिक्रीया या प्रकरणातील तक्रारदार व जळगाव महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी व्यक्त केली आहे. 

 दिल्ली येथे  राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या  उप मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर  डॉ प्रवीण  गेडाम  सध्या कार्यरत आहेत .  

डॉ.प्रवीण गेडाम हे जळगाव महापालिकेचे सन 2005 मध्ये पहिले आय.ए.एस.दर्जाचे आयुक्त होते. घरकुल गैरव्यवहार प्रकरणी त्यांनी जळगाव शहर पोलीस स्टेशनला तीन फेब्रुवारी 2006 मध्ये गुन्हा दाखल केला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. 

गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल सहा वर्षानी म्हणजे सन 2012 मध्ये पोलिस उपविभागीय अधिकारी ईश्‍यू सिंधू यांची तपासअधिकारीपदी नियुक्ती झाली आणि तपास करून अटकेची कारवाई केली होती. 

घरकुल प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर महापालिकेचे आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याविरूध्द अविश्‍वास ठराव दाखल करण्यात आला होता. महापालिकेत सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील गटाची सत्ता असल्यामुळे हा ठराव मंजूर करण्यात आला. जळगावात नगरसेवकांवर गुन्हा दाखल केल्यामुळे डॉ.गेडाम यांची राज्यात त्यांच्या नावाचा दबदबा निर्माण झाला होता. 

जिल्हापरिषद व महापालिकेतील सत्ताधारी आपल्याकडे त्यांची नियुक्ती करून घेण्यास नकार देत होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री (कै.) विलासराव देशमुख यांनी आपल्याच ताब्यात असलेल्या लातूर जिल्हा परिषदेच्या 'सीईओ' पदी त्यांची नियुक्ती करण्याचे धाडस दाखविले होते. 

घरकुल प्रकरणाच्या निकालाबाबत प्रतिक्रीया व्यक्त करतांना डॉ,प्रवीण गेडाम म्हणाले, " आपण सन 2006 मध्ये फिर्याद दिली ती केवळ बेकायदेशीरपणा व अनियमितता दिसली त्याच अधारावर. यात कोणत्याही व्यक्तीव्देशातून केली नव्हती हे या निकालावरून स्पष्ट झाले आहे. एखाद्या गोष्टीचा पाया रचला आणि यश मिळाल तर त्याचा आनंद वेगळाच असतो. घरकुल प्रकरणाच्या या निकालाने तो आनंद मी अनुभवत आहे. तपास अधिकारी, सरकारी वकिल यांनी या खटल्यास प्रामणिकपणे न्यायाची बाजू लावून धरली त्यांचे मी आभार मानतो" .

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com