उर्मिलासाठी पायघड्या; सामाजिक कार्यकर्ते ताटकळले; प्रवीणदादांची पुण्याच्या उमेदवारीतून माघार

उर्मिलासाठी पायघड्या; सामाजिक कार्यकर्ते ताटकळले; प्रवीणदादांची पुण्याच्या उमेदवारीतून माघार

पुणे : `'अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या प्रवेशासाठी काँग्रेसकडून रेड कार्पेट टाकले जाते, पण २५-३० वर्षे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आणि मराठा क्रांती मोर्चाचे प्रतिनिधित्व करत सामाजिक प्रश्न मांडणाऱ्या कार्यकर्त्यांना ताटकळत ठेवत त्यांची अवहेलना केली जाते, असे काँग्रेसकडून पुणे लोकसभा इच्छुक असलेले प्रवीण गायकवाड यांनी म्हटले आहे. शिवाय 'काँग्रेसने कोणालाही उमेदवारी द्यावी, मी माघार घेत आहे', अशी घोषणाही त्यांनी `सरकारनामा`शी बोलताना केली.

पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडून इच्छुक असलेले प्रवीण गायकवाड गेली काही दिवस दिल्लीत ठाण मांडून होते. शिवाय काँग्रेसची उमेदवारी मिळो, अथवा ना मिळो, तरीही काँग्रेस प्रवेश करणारच अशी भूमिका गायकवाड यांनी घेतली होती. मात्र तरीही गायकवाड यांच्या प्रवेशाबाबत कोणताही निर्णय काँग्रेस श्रेष्ठीनकडून घेतला गेलेला नाही.

दुसरीकडे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा प्रवेश तातडीने झाला. यावर आपेक्ष घेत  गायकवाड यांनी उद्ग्विन होत, 'काँग्रेसने कोणालाही उमेदवारी द्यावी, मी माघार घेत आहे, अशी भूमिका घेतली आहे. उर्मिला मातोंडकर यांना उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून काॅंग्रेस उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com