`काॅंग्रेस नेत्यांनी खांद्यावर उपरणे टाकले; पण आपुलकी दाखविली नाही`

`काॅंग्रेस नेत्यांनी खांद्यावर उपरणे टाकले; पण आपुलकी दाखविली नाही`

पुणे : माझ्या खांद्यावर काॅंग्रेसने फक्त उपरणे टाकले पण स्वीकारले नाही, अशी खंत व्यक्त करत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. 

गायकवाड यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी शेतकरी कामगार पक्ष सोडून काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पक्षाचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश झाला होता.

ते पुणे लोकसभा मतदारसंघातून काॅंग्रेसकडून इच्छुक होते. काॅंग्रेसशी साथ तुम्ही आता सोडली का, या प्रश्नावर त्यांनी सांगितले की मी काॅंग्रेसकडून लोकसभेसाठी इच्छुक असल्याने मुंबईत जाऊन पक्षप्रवेश केला होता. मला तिकिट नाकारले तरी मी लोकसभा निवडणुकीत पक्षाचे आणि  काॅंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे प्रामाणिकपणे काम केले. मात्र काॅंग्रेसकडून कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. पक्षाच्या नेत्यांनी आमच्याबद्दल आपुलकी तर दाखवली नाहीच; पण आमच्या कार्यकर्त्यांची दखलही घेतली गेली नाही. त्यामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीसोबत जाण्याची भूमिका मांडली.``

संभाडी ब्रिगेडने येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिगेडच्या राज्य कार्यकारिणीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची ताकद बनून येत्या निवडणुकीचे काम करणार असल्याचे गायकवाड यांनी जाहीर केले. ते म्हणाले, ``शेतकरी, महिला, कामगार, नोकरदार अशा सर्व वर्गांसाठी पवार यांनी मोठे काम उभे केले आहे. त्यांच्या पुरोगामी धोरणांमुळे महाराष्ट्राची देशात ओळख निर्माण झाली आहे. ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे राहण्याची इच्छा होती. त्यानुसार हा निर्णय घेतला आहे.``

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com