महिला आमदाराच्या कौटुंबिक वादाचे विधानपरिषदेत पडसाद

महिला दिनाच्या निमित्ताने गुरुवारी विधानपरिषदेत महिला सक्षमीकरणाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र त्यावर चर्चा सुरु होण्याअगोदर विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी मुंबईत घडलेल्या एका आमदाराच्या सुनेचा छळाच्या गुन्ह्याबाबत सरकारची भूमीका स्पष्ट करण्याची मागणी केली
Pravin Darkar Raised Women MLA Domestic Violece Issue in Council
Pravin Darkar Raised Women MLA Domestic Violece Issue in Council

मुंबई : महिला दिनाच्या निमित्ताने गुरुवारी विधानपरिषदेत महिला सक्षमीकरणाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र त्यावर चर्चा सुरु होण्याअगोदर विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी मुंबईत घडलेल्या एका आमदाराच्या सुनेचा छळाच्या गुन्ह्याची माहिती देत सरकारने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. ही मागणी अमान्य झाल्यामुळे विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला त्यामुळे सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब झाले.

सभापती महोदयांचा प्रस्ताव दुपारी उपसभापती निलम गो-हे यांनी मांडला. महिला दिनाच्या निमित्ताने राज्यातील महिलाच्या शाश्वत विकासाची उद्दीष्टे व महिला सक्षमीकरण याबाबत स्त्रियांच्या सामाजिक विकास येत असणारे अडथळे आदी विषयांच्या अनुषंगाने उपसभापतींनी या प्रस्ताव मांडला होता.

विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी या प्रस्तावाचे स्वागत केले. महिला दिनाच्या निमित्ताने मांडण्यात आलेल्या महिलांच्या विषयांचा अंर्तभाव असणा-या प्रस्तावावर चर्चा व्हायला हवीच, परंतु त्याच वेळी एखाद्या ठिकाणी कौटुंबिक हिंसाचाराची घटना घडत असेल व सासूकडून सुनेचा अतोनात छळ होत असेल तर हे अतिशय गंभीर आहे. प्रसिध्दी माध्यमांमध्ये मुंबईतील एका नेत्यांच्या सुनेच्या छळाच्या बातम्या प्रसिध्द झाल्या आहेत. या संदर्भातील वस्तुस्थिती सभागृहासमोर आली पाहिजे अशी मागणी दरेकर यांनी केली.

पण यावर सत्ताधारी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी उभे राहात आक्षेप घेतला. त्यावर घोषणाबजी झाली. विरोधक वेलमध्ये येऊन घोषणाबाजी करु लागले. यावेळी संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी सरकारची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. विरोधकांना चर्चा नको आहे, म्हणुन गोंधळ घालत असल्याचे ते म्हणाले. यावर उपसभापती निलम गोऱ्हे यांनी गटनेत्यांची दालनात बैठक घेण्याचा प्रस्ताव दिला. मात्र सभागृहातला गोंधळ कमी झाला नाही. त्यामुळे सभागृहाचे कामकाज काही काळ तहकूब केले. त्यानंतर शिवसेनेच्या मनिषा कायंदे यांनी प्रस्तावावर चर्चा केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com