प्रवीण दरेकरांना मागठाणे पुन्हा पुन्हा खुवाणवतोय...

,...
pravin darekar have a atteintion on magthane constituency
pravin darekar have a atteintion on magthane constituency

मुंबई : एकेकाळी मागठाण्याचे आमदारपद भूषविलेले भाजपचे प्रवीण दरेकर आता मुंबई जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अशी पदे भूषवित असले तरी मागठाणे मतदारसंघ पुन्हा काबीज करण्याची त्यांची इच्छा अजूनही कायम आहे, हे नुकतेच दिसून आले.

पक्षाच्या संघटनपर्व कार्यक्रमात बोलताना आपण विरोधी पक्षनेते म्हणून राज्याच्या समस्यांना वाचा फोडणार असलो तरी मागठाण्यातील समस्या सोडविण्याकडेही लक्ष देऊ, असेही त्यांनी जाहीर केले. 

मागठाण्यातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 2009 मध्ये आमदार झालेले दरेकर 2014 मध्ये शिवसेनेच्या प्रकाश सुर्वे यांच्याकडून पराभूत झाले. त्यानंतर ते भाजपमध्ये गेले व मुंबई बॅंकेचे अध्यक्ष झाले, नुकतेच त्यांना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपदही मिळाले. 2019 ची निवडणूक मागठाण्यातूनच लढविण्याची त्यांची इच्छा होती, मात्र सेना-भाजप युती झाल्याने तो मतदारसंघ शिवसेनेकडेच गेला.

पराभूत झाल्यानंतरही एक एक शिखरे काबीज करीत असताना मागठाण्याचे आकर्षण अद्यापही त्यांना आहे. आपले मागठाण्याकडे लक्ष असल्याची ग्वाही त्यांनी, भाजपच्या मागाठाणे विधानसभा मंडल अध्यक्षपदी दिलिप उपाध्याय यांची निवड करण्याच्या संघटनपर्व कार्यक्रमात दिली. 

समाजातील सर्व घटकांना भाजपाचा कोणताही पदाधिकारी हा आपला तारणहार आहे, अशी भावना निर्माण व्हायला हवी, तसे काम सर्वांनी करावे, असे आवाहनही दरेकर यांनी यावेळी केले. भाजपच्या सर्वसमावेशक नेतृत्वासारखे होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासारख्या विरोधकाने देखील अमित शहा राष्ट्रभक्त असल्याचे म्हटले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मेहनती आहेत, तसेच देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व प्रतिभासंपन्न आहे. प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अशा नेतृत्वाचा आदर्श घ्यावा, अशी अपेक्षाही दरेकर यांनी व्यक्त केली. 

गोंधळलेले सरकार 
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे गोंधळलेले सरकार आहे. या गोंधळलेल्या सरकारमध्ये संवाद नसून विसंवादाच जास्त आहे, असेही दरेकर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com