पंडित नेहरूंनी आरक्षणास विरोध केला होता: दरेकर

pravin darekar
pravin darekar

मुंबई: पंडित जवाहरलाल नेहरू यांनी गोलमेज परिषदेत आरक्षणाला विरोध केला होता, असे विधान विरोध पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केल्याने सभागृहात गदारोळ झाला.

लोकसभा आणि विधानसभेत अनुसुचित जाती आणि जमातींसाठी आरक्षण वाढवण्यासंबंधाने संसदेने केलेल्या विधेयकाच्या समर्थनार्थ आज प्रस्ताव आणण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत प्रस्ताव मांडला. त्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन दिले. यावेळी फडणवीस म्हणाले, राज्यात जवळपास 25 अशा जमाती आहे की त्यांचा प्रतिनिधी या सभागृहात आला नाही. त्यांना ही न्याय मिळाला पाहिजे. पुढील 40 वर्ष आरक्षण कायम राहील पाहिजे.

विधान परिषदेत या संबंधाने चर्चा करत असताना विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी गोलमेज परिषदेत पंडित नेहरूंनी आरक्षण देण्यास विरोध केला होता, असे विधान केले. त्यानंतर एकच गदारोळ उडला. त्यामुळे विधान परीषदेचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com