शिवसेनेची कॉंग्रेससोबत हातमिळवणीची मानसिकता सुरुवातीपासूनच : दरेकर 

शिवसेनेची कॉंग्रेससोबत हातमिळवणीची मानसिकता सुरुवातीपासूनच : दरेकर 

पुणे :  सत्तेसाठी कॉंग्रेसबरोबर जाण्याची शिवसेनेची मानसिकता सुरवातीपासूनच असल्याचे टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्‍तव्यावरून स्ष्ट होत असल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. 

चव्हाण यांच्या गौप्यस्फोटामुळे शिवसेनेची एक एक गोष्ट आता समोर येऊ लागली आहे. निवडणुकीपूर्वीच शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येणार असा अंदाज शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला होता. मात्र, आता माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी पाच वर्षपूर्वीच्या गोष्टी सांगितल्याने शिवसेनेची कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करण्याची आधीपासूनची मानसिकता होती, अशा प्रकारचे चित्र समोर आल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे. 

नाइट लाइफबाबत घाईत निर्णय घेण्याची आवश्‍यकता नाही. यामुळे मुंबईच्या सुरक्षेवर भार पडणार आहे. नाइट लाइफचा निर्णय महाराष्ट्राच्या संस्कृतीला आघात आहे. या साऱ्या गोष्टींचा विचार राज्यकर्त्यांनी करण्याची गरज आहे, असे दरेकर यांनी सांगितले. 

पर्यावरण मंत्री व शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी नाइटलाइफचा विषय प्रतिष्ठेचा केला आहे. त्यामुळे मुंबईत या निर्णयाची अंमलबावणी निश्‍चितपणे होईल. मात्र, पुण्यासारख्या शहरात निर्णय घेण्याची घाई न करता मुंबईतील अनुभव लक्षात घेऊन निर्णय घेतला जावा, अशी भूमिका मांडण्यात येत आहे. त्यामुळे पुण्याबाबत तातडीने निर्णय होण्याची शक्‍यता नसल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com