Pravin Darade & Pallavi Darade | Sarkarnama

मुंबई पालिकेच्या अतिरीक्‍त आयुक्‍तपदी आधी पत्नी मग पती !

समीर सुर्वे 
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

अतिरीक्त आयुक्त पदी कार्यरत होते. दराडे यांच्या पत्नी डॉ. पल्लवी दराडे यांनीही महानगर पालिकेच्या अतिरीक्त आयुक्त पदी काम केले आहे.

मुंबई : मुंबई महानगर पालिकेच्या अतिरीक्त आयुक्त पदी प्रवीण दराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या अतिरीक्त आयुक्त पदी कार्यरत होते. दराडे यांच्या पत्नी डॉ. पल्लवी दराडे यांनीही महानगर पालिकेच्या अतिरीक्त आयुक्त पदी काम केले आहे. पती-पत्नी यांनी पालिकेच्या अतिरीक्त आयुक्त पदी काम केल्याची हि पहिलीची वेळ आहे.

दराडे हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या 1998 च्या बॅचचे अधिकारी आहेत.त्यांनी पवई आयआयटी मधून स्ट्रक्‍चरल इंजिनियरींग मधून एमटेक ही पदव्युत्तर पदवी घेतली आहे. ते कोल्हापूर आणि नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते. तसेच,महाराष्ट्र विमान विकास कंपनीचे संयुक्त व्यवस्थापकिय संचालक,नागपूर सुधार प्रन्यासाचे अध्यक्ष ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव म्हणून काम केले आहे.

दराडे दांपत्य राहात असलेले सध्याच्या निवासस्थानावरुन महानगर पालिका आणि राज्य सरकारमध्ये वाद रंगला होता.मलबार हिल येथील हा बंगला महानगर पालिकेच्या मालकीचा आहे. डॉ.पल्लवी दराडे यांची मुंबई महानगर पालिकेतून बदली झाल्यानंतर पालिकेने हा बंगला राज्य सरकारकडे परत मागितला होता.मात्र,सरकारने हा बंगला देण्यास नकार दिला होता.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख