कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी प्रतिभा भैलुमे 

कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी प्रतिभा भैलुमे 

कर्जत (जि. नगर) : कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या प्रतिभा भैलुमे यांची, तर उपनगराध्यक्षपदी नामदेव राऊत यांची बिनविरोध निवड झाली. 

आज या निवडीसाठी पिठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक झाली. या वेळी एकूण सतरा पैकी सोळा नगरसेवक उपस्थित होते.भाजपचे सोमनाथ कुलथे हे एकमेव नगरसेवक अनुपस्थित होते.

येथील नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव होते आणि त्यासाठी भाजपच्या प्रतिभा भैलुमे यांचा एकमेव अर्ज दाखल असल्याने त्यांची बिनविरोध निश्‍चित होती.मात्र उपनगराध्यक्षपदासाठी भाजपच्यावतीने तेरा नगरसेवक समवेत घेत मावळते नगराध्यक्ष नामदेव राउत, तर कॉंग्रेसच्यावतीने पक्षाचे चार नगरसेवक समवेत घेत मोनाली तोटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे निवडणुकीत रंगत आली होती. मात्र अपेक्षेप्रमाणे अर्ज माघारी घेण्याच्या अर्धा तास अगोदर मोनाली तोटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.त्यामुळे नगराध्यक्षपदी प्रतिभा भैलुमे व उपनगराध्यक्षपदी नामदेव राउत यांची निवड जाहीर केली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com