prataprao bhosale meet laxmanrao patil in icu | Sarkarnama

लक्ष्मणराव, मी आलोय प्रतापराव... अन तात्यांच्या डोळ्यांची उघडझाप झाली!

उमेश बांबरे
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

दोघेही किसन वीरांचे अनुयायी.

सातारा : राष्ट्रवादीचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील गेल्या पाच सहा दिवसापासून अत्यवस्थ आहेत, याची माहिती ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले भाऊंना समजली. त्यांनी तडक हॉस्पिटल गाठले.  अतिदक्षता विभागात ते लक्ष्मणराव पाटील यांच्यासमोर उभे राहिले. 'लक्ष्मणराव मी आलोय प्रतापराव...अशी हाक मारली, आणि तात्यांच्या डोळ्यांची उघडझाप झाली. अन भाऊ गहिवरले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

प्रतापराव भोसले व लक्ष्मणराव पाटील यांची दोस्ती आणि दुश्मनी संपूर्ण जिल्ह्याने पाहिली आहे. दोघेही किसन वीरांचे अनुयायी. प्रतापराव (भाऊ) आणि लक्ष्मणराव (तात्या) यांना बरोबर घेवून वीरांनी वाईचे राजकारण केले.

प्रतापरावभाऊंचा जीवलग मित्र म्हणून तात्यांची पाहिल्यापासून ओळख राहिली. पण काही राजकीय कारणांमुळे दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. जिगरी दोस्त एकमेकांचे दुश्मन झाले. पण दुःखात आणि अडचणीच्या समयी दुश्मनी सगळेच विसरतात. याची प्रचिती बुधवारी आली. तात्या अत्यवस्थ असल्याची माहिती प्रतापरावभाऊंना मिळाली आणि त्यांनी थेट प्रतिभा हॉस्पिटल गाठले. अतिदक्षता विभागात ते लक्ष्मणराव पाटील यांच्यासमोर उभे राहिले. 'लक्ष्मणराव मी आलोय प्रतापराव...अशी हाक त्यांनी मारली. तसे तात्यांच्या डोळ्यांची उघडझाप झाली. त्याक्षणी भाऊ गहिवरले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यानंतर जड पावलांनी प्रतापरावभाऊ अतिदक्षता कक्षातून बाहेर आले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

टॅग्स

संबंधित लेख