प्रतापकाका तुम्ही बाहेर पडा, अन विधानपरिषद मागा!

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी केंद्रीयमंत्री बबन ढाकणे यांच्यातील असणारे मैत्रीचे संबध पाहता दोन्ही ढाकणेंनी खर्चलेला शब्द पवार खाली पडुन देणार नाहीत, असा विश्वास ढाकणे समर्थक व्यक्त करीत आहेत.
 pratap dhakane supporters lobbing for mlc
pratap dhakane supporters lobbing for mlc

पाथर्डी (नगर): "काका तुम्ही बाहेर पडा आणि ज्या पक्षासाठी तुम्ही झिजलात, त्या पक्षाला आता विधानपरीषद मागा," असा आग्रह ढाकणे यांच्या समर्थकांनी धरला आहे. केदारेश्वर सहकारी कारखान्याचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रथमच मंगळवारी समर्थकांशी जाहीरपणे संवाद साधणार आहेत. 

पाथर्डी येथील संस्कारभवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे यांच्या समर्थकांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.  प्रताप ढाकणे हे राष्ट्रवादीच्या स्थापनेच्यावेळी शरद पवार यांच्या सोबत होते. पक्षसंघटनेसाठी त्यावेळी ढाकणे यांनी चांगले योगदान दिले. पुढे ते गोपिनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमधे गेले. तेथेही भाजपाच्या संघटनासाठी त्यांनी चांगले काम केले. माजी खासदार दिलीप गांधी यांच्याशी झालेल्या मतभेदामुळे त्यांनी भाजप सोडली व राष्ट्रवादीमधे प्रवेश केला. गेल्या सहा वर्षापासुन ते पक्षाच्या संघटना बांधणीसाठी काम करीत आहेत. 

आता विधानपरीषदेच्या जागा रिक्त होत आहेत. त्यासाठी ढाकणे यांनी पक्षश्रेष्ठीकडे मागणी करावी, अशी मागणी ढाकणे यांचे समर्थक करीत आहेत. त्यासाठी ढाकणेंच्या निवडक कार्यकर्त्यांनी पाथर्डीत मंगळवारी (ता. 17 ) मेळावा आयोजित केला आहे. मेळाव्यात संवाद साधण्यासाठी प्रताप ढाकणे येत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com