वाघाचा बछडा, लढणार आणि जिंकणारच : अॅड. प्रताप ढाकणे

शेवगाव मतदार संघात सामाजिक व राजकीय वातावरण प्रदूषित झाले आहे. सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे. समाज उद्ध्वस्थ होण्याची भिती आहे. हे घडू नये यासाठी सर्वांना सोबत घेऊन आता लढायचं आहे. तुमचं पाठबळ हीच शक्ती असल्याने हा वाघाचा बछडा लढणार आणि जिंकणार आहे, असा विश्वास केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष अॅड. प्रताप ढाकणे यांनी व्यक्त केला.
वाघाचा बछडा, लढणार आणि जिंकणारच : अॅड. प्रताप ढाकणे

पाथर्डी (नगर) : शेवगाव मतदार संघात सामाजिक व राजकीय वातावरण प्रदूषित झाले आहे. सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे. समाज उद्ध्वस्थ होण्याची भिती आहे. हे घडू नये यासाठी सर्वांना सोबत घेऊन आता लढायचं आहे. तुमचं पाठबळ हीच शक्ती असल्याने हा वाघाचा बछडा लढणार आणि जिंकणार आहे, असा विश्वास केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष अॅड.  प्रताप ढाकणे यांनी व्यक्त केला.

पाथर्डी येथे कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा आज झाला. या वेळी ते बोलत होते. ढाकणे म्हणाले, ''मी भाजपात पंधरा वर्षे संघटना बांधली. पण काही कारणांनी, अपप्रवृत्तींमुळे मी बाहेर पडलो. राष्ट्रवादीतही खूप वाट पाहिली. आता काय करावे, असा प्रश्न होता. कार्यकर्त्यांनी लढायला सांगितले, त्यामुळे आता थांबण्यात अर्थ नाही. मी वाघाचा बछडा आहे. लढणार आणि जिंकणारच. तुमचा आशीर्वाद महत्वाच आहे, कोणाच्या उपकारावर नाही, तर जनतेच्या आशीर्वाद हीच माझे बलस्थाने आहेत. सत्तास्थाने मिळो ना मिळो, मी वंचितांच्या प्रश्नांसाठी लढत राहिलो, पुढेही लढावेच लागणार आहे.''

घुले, राजळे घराणे स्वार्थी 
प्रभावती ढाकणे म्हणाल्या, ''पाथर्डीतील राजळे व शेवगावमधील घुले हे स्वार्थी घराणे आहेत स्वर्गीय राजीव राजळे यांना मी भावाप्रमाणे मानले. प्रताप ढाकणे यांचे ते मित्र होते. त्यांची मैत्री त्यांनी जपली. राजकारण वेगळे आणि संबंध वेगळे. सध्याच्या लोकप्रतिनिधी आमदार मोनिका राजळे यांनी माझ्या सासर्‍यांच्या कार्यक्रमात येण्यासाठी मुख्यमंत्र्यांना आणि पंकजा मुंडे यांना रोखण्याचा प्रयत्न केला. आता निवडणुका आल्याने राजळे यांनी आता मराठा- वंजारी असा दुजाभाव सुरू केला आहे. तुम्हाला वंजारी समाजाची मते लागतात, मग हा भेदभाव कशासाठी करतात. जनतेनेही ध्यानात घेतले पाहिजे.''

''राजकीय पोळी भाजण्यासाठी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेतात. पंकजा मुंडे ही त्यांना बहीण मानतात, मग पाच वर्षे ही मंडळी स्वार्थी राजकारण का करतात. शेवगावमध्ये घुले घराणेही असेच आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शेवगाव पंचायत समितीचे सभापतीपद त्यांच्याकडे आहे. मी त्यांना जिल्हा परिषदेतून शाळा खोल्या मागितल्या. त्या अडीच वर्षे मिळाल्या नाहीत. ढाकणे मोठे झाले, तर त्यांना भीती वाटते. म्हणून शक्य तेथे विरोध करण्याचे काम राजळे यांनी केले आहे. आता पक्षाचे चिन्ह कोणताही असो, प्रताप ढाकणे लढणार ते जिंकण्यासाठीच.'' असेही त्या म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com