कोरोनाशी लढण्यासाठी खासदार चिखलीकरांकडून एक कोटीचा निधी

कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय जनता पक्षाचे नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यांच्या खासदार निधीतून एक कोटी रुपयांचा निधी पंतप्रधान सहाय्यता निधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केल्याची माहिती खासदार चिखलीकर यांनी रविवारी (ता. २९) पत्रकार परिषदेत दिली.
pratap chikhalikar donates 1 crore to fights coronavirus
pratap chikhalikar donates 1 crore to fights coronavirus

नांदेड - कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय जनता पक्षाचे नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यांच्या खासदार निधीतून एक कोटी रुपयांचा निधी पंतप्रधान सहाय्यता निधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केल्याची माहिती खासदार चिखलीकर यांनी रविवारी (ता. २९) पत्रकार परिषदेत दिली.

पंतप्रधान सहाय्यता निधीला एक कोटीच्या निधीशिवाय भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या आदेशानुसार माझ्या खासदाराच्या मानधनातून एक लाख रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीला देण्यात आले असल्याचे श्री. चिखलीकर यांनी सांगितले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी प्रत्येक खासदारांनी एक कोटी रुपयांचा निधी देण्याचे सूचित केले होते. त्याची अंमलबजावणी करत पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार एक कोटी रुपयांचा निधी पंतप्रधान कार्यालयाकडे पत्राव्दारे सुपुर्द केला आहे. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी २५ हजार रुपये रोख प्रदेश भाजपाकडे सुपूर्द करण्यात आले असल्याचे खासदार चिखलीकर यांनी सांगितले.

नांदेड जिल्हा भाजपाच्यावतीने दररोज २५० गोरगरीब लोकांना दोन वेळ जेवणाची व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. लोहा येथे बाहेरगावाहून आलेल्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था कारेगाव येथील गुरुव्दाराच्या वतीने करण्याची विनंती आपण स्वतःहून केल्यामुळे त्यांनी जेवणाची व्यवस्था करण्यास तयार झाले आहेत. कंधार शहरात आलेल्या बाहेरगावहून लोकांना एकनाथ महाराज उम्ररजकर देवस्थानच्या वतीने करण्यात येणार असल्याचे श्री. चिखलीकर यांनी सांगितले.

कोरोनाशी मुकाबला करणारी देशातील जनता मोठ्या ताकदीने लढा देत आहे. देशात संचारबंदी काळात देशातला एकही माणुस अन्नाशिवाय उपाशी राहता कामा नये अशी भूमिका घेवून सर्वसामान्यांच्या मदतीला केंद्र सरकार धावून जात असल्याचे दिलासादायक चित्र संपूर्ण देशभरात निर्माण झाले आहे.
- प्रताप पाटील चिखलीकर, खासदार, नांदेड.

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com